चोपडा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले सराफ बाजाराचे सर्व्हेक्षण

चोपडा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले सराफ बाजाराचे सर्व्हेक्षण

चोपडा:येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र वाणिज्य महाविद्यालयातील वाणिज्य विभागातर्फे आज दि.२० फेब्रुवारी २०२३ रोजी चोपडा शहरातील सराफ बाजारातील सराफ व्यावसायिकांचा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये महाविद्यालयातील टी.वाय.बी.कॉमच्या विद्यार्थ्यांनी एक प्रश्नावली तयार करून चोपडा शहरातील सराफ व्यावसायिक यांच्या थेट मुलाखती घेऊन व प्रश्नावली द्वारे त्यांच्याकडून विविध माहिती मिळवून त्यांचा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेक्षणामध्ये विविध गोष्टी जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी काही प्रश्न व्यवसायिकांना विचारले.त्यामध्ये व्यवसायाची सुरुवात केव्हापासून झाली? तसेच सुरुवातीला व्यवसाय करत असताना किती कर्मचाऱ्यांची संख्या होती? त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये गुंतवलेले भांडवल किती आहे? व्यवसायासाठी कुठल्या प्रकारे जाहिरात केली जाते? आपण व्यवसाय करत असताना आपला कच्चा माल कोणत्या ठिकाणाहून खरेदी करतात? कशाप्रकारे खरेदी करतात? जीएसटी किती देतात? त्याचप्रमाणे काही अंधश्रद्धा व श्रद्धा यांना ग्राहक बळी पडतात का? अमावस्या असेल तर अमावस्येच्या दिवशी ग्राहक सोने-चांदी खरेदी करतात की नाही? किंवा ग्राहक सोने-चांदीची कोणत्या दिवसांमध्ये ग्राहक जास्त प्रमाणात खरेदी करतात? सणासुदीमध्ये ग्राहकांकडून सोने-चांदीची खरेदी जास्त होते का? तसेच होत असेल तर ग्राहक सोने नाणे खरेदी करत असताना किंवा चांदी खरेदी करत असताना मुहूर्त व वेळ पाहतात का? त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी ग्राहक सोने खरेदी करतात का? करत नसतील तर का करत नाहीत? या सर्व गोष्टींबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी महाविद्यालयातील टी.वाय.बीकॉमच्या विद्यार्थ्यांनी हे महत्वपूर्ण आधुनिक सर्व्हेक्षण केले. यामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांनी जाऊन तेथील दुकान मालकांना प्रश्नावली द्वारे प्रश्न विचारून माहिती गोळा केली व त्या माहितीचे रूपांतर एका अहवालामध्ये केले. हा अहवाल बनवल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी देखील हा उपयुक्त ठरणार आहे. यातून विद्यार्थ्यांना व्यवसायिकांचा उद्देश तसेच सराफ व्यवसायिक कशा पद्धतीने व्यवसाय करतात? सोने कशा पद्धतीने खरेदी करतात? व त्याची विक्री कशा पद्धतीने करतात? हॉलमार्क किंवा विविध प्रमाणके यांचा वापर कसा केला जातो? २४ कॅरेट, २२ कॅरेट सोने कशा पद्धतीने खरेदी केले जाते? किंवा त्याची विक्री कशा पद्धतीने केली जाते? यांच्या बद्दल विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण माहिती जाणून घेतली. याप्रसंगी टी. वाय.बीकॉम वर्गातील विद्यार्थी तसेच विभाग प्रमुख डॉ.सी. आर. देवरे, व्ही.जी.दारूंटे, सहा.प्रा. चेतन बाविस्कर व विद्यार्थी उपस्थित होते.