संविधान दिनाचे औचित्य साधत अखिल मराठा समाजसेवा प्रतिष्ठान व न्यू माऊली नेत्रालय तर्फे सातगाव (डों) नेत्र तपासणी शिबिर संपन्न

संविधान दिनाचे औचित्य साधत अखिल मराठा समाजसेवा प्रतिष्ठान व न्यू माऊली नेत्रालय तर्फे सातगाव (डों) नेत्र तपासणी शिबिर संपन्न

पाचोरा प्रतिनिधी – आज दिनांक 27/11/2022 रोजी डों, सातगाव डोंगरी येथे संविधान दिनाचे औचित्य साधत अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र व सुभाष अशी बहुद्देशीय संस्था संचलित न्यु माउली नेत्रालय पाचोरा यांच्या सयुक्त विद्यामाने नेत्र तपासणी शिबिर डोंगरी सातगाव आदर्श आश्रम शाळेत आयोजित करण्यात आले होते सकाळी 9 वाजता राजे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ, बाबा साहेब अंबेडकर यांचे प्रतिमा पूजन शुभ हस्ते संस्थापक अध्यक्ष प्रा, डॉ, योगेश पाटील संस्थापक सचिव संजय पाटील शाखा अध्यक्ष सतीष पाटील सरपंच उषा सुभाष पाटील उप सरपंच शकीला तडवी मा, सरपंच भारत राठौड़ ग्रा, पंचायत सदस्य सागर चौधरी ,अंबादास मल्हार ,आबा भागवत पाटील, दीपाली सतीष पाटील, शांताबाई ज्ञानेश्वर पाटील ,आदर्श आश्रम शाळा मुख्य ध्यापक राहुल पवार , पों,बे हायस्कूल मुख्य ध्यापक उत्तम मनगटे , फार्मसिस्ट गोपाल नाईक, यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले नंतर नेत्र तपासणी सुरु करण्यात आले शिबिरांत गावातील अनेक नागरिकांनी नेत्र शिबिराचा लाभ घेतला. प्रत्येक गावात मोफत नेत्र तपासणी शिबिर व आरोग्य शिबिर घेण्याचा मानस अध्यक्ष प्रा.डॉ.योगेश पाटील व सचिव संजय पाटील यांनी यावेळी केला.या शिबिरासाठी अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठान (महा)शाखा डोंगरी साजगाव चे सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली प्रसंगी न्यु.माऊली नेत्रा लयाचे opthometrist संतोष पवार, संदीप राठोड सह प्रतिष्ठान चे शाखा सातगाव अध्यक्ष-सतीश बाजीराव पाटील ,उपाध्यक्ष-उमेश अशोक पाटील, सचिव-ज्ञानेश्वर रामदास पाटील,सदस्य -भिला आधार पाटील,बाळु राघो बोरसे ,संतोष खंडू बछे,समाधान रामदास पाटील,भगवत महादु पाटील,रामा शंकर पाटील, सतीष रमेश पाटील,प्रकाश हिलाल पाटील,दत्तू शंकर पाटील,कैलास शंकर बछे, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्तित होते.