समर्पण फाउंडेशनतर्फे शिवस्मारक उभारणीसाठी सर्व शिवभक्तांना सहकार्याचे आवाहन
गावाच्या अस्मितेचा आणि शिवप्रेमाचा प्रतीक ठरणाऱ्या शिवस्मारक उभारणीसंदर्भात निर्धार संस्थेने आपला ठाम निर्धार व्यक्त केला आहे. शिवस्मारकाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेला संपूर्ण रोडमॅप आणि नियोजन तयार असून, गावाच्या नव्या नेतृत्वाने हे कार्य पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आमखेडा, रामजीनगर, आमराई, छत्रपती शिवाजीनगर, रामकृष्ण नगर आणि रमाबाई कॉलनी परिसरातील सर्व शिवभक्तांसाठी हा प्रकल्प अभिमानाचा विषय ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. शिवस्मारक हे केवळ स्मारक नसून भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
तसेच, काही ठिकाणी पसरवल्या जाणाऱ्या अफवांकडे दुर्लक्ष करून सर्व नागरिकांनी आणि शिवभक्तांनी या पवित्र कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन समर्पण फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
























