स्वतःसाठी तर सर्वजण जगतात जरा त्याच्या पलीकडे जाऊन समाजातील तरुणांनी विचार करावा.-अनिल महाजन मुंबई

स्वतःसाठी तर सर्वजण जगतात जरा त्याच्या पलीकडे जाऊन समाजातील
तरुणांनी विचार करावा.-अनिल महाजन मुंबई

जीवनात प्रत्येक जन जन्माला आल्यानंतर स्वतःसाठी व स्वतःच्या कुटुंबासाठी नेहमी झटत असतो ते प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहेच.पण या पलीकडेही विचार करणारी माणसे या जगात अनेक होऊन गेली.

आयुष्यात मनुष्य जीवनात आल्यानंतर प्रत्येकाचे लहान-मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणूस धडपड करत असतो. आपला व्यवसाय ,नोकरी , शेती व इत्यादी कामे यशस्वी रित्या करून आप आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह प्रत्येक जण चालवत असतो. पैसे कमवणे घर-दार ,गाडी ,बंगला उभारणे मुलाबाळांच्या नोकरी -लग्न इत्यादी साठी प्रयत्न करणे. हेच आजच्या जीवनात अनेक लोक करताना दिसतच आहेत.

या सर्व गोष्टी करूनही यापलीकडे जाऊन समाजा समोर एक नवीन आदर्श निर्माण करण्यासाठी व जन्माला आल्यानंतर आपण आपल्या समाजाचे काहीतरी देणे लागतो. आपल्या हातून काहीतरी मोठे सदकार्य पार पडावे. देशाचा व समाजाचा विचार करणारे मोजके लोक आपल्याला या सद्याच्या जगात पहायला मिळतात स्वतःसाठी तर आयुष्यात प्रत्येक व्यक्ती जगतो आहे. पण दुसऱ्यासाठी जगण्याचा आनंद हा वेगळा असतो. अन्यायग्रस्त व शोषित पीडित यांचा आधार स्तंभ व्हावे हे बोटावर मोजण्या इतक्या लोकांना वाटत असते.

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज , क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले , भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गोर गरीब गरजू , शोषित पीडित वंचित सर्व धर्म समभाव कुठल्याही जाती-पाती साठी मर्यादित काम न करता माझे जीवन सर्वांसाठी आहे.अशा विचारसरणीचे सार्वजनिक जीवनात काम करणारे मुंबई येथील तरुण तडफदार नेतृत्व अनिलभाऊ महाजन हे आपल्या समाजाचे सामाजिक काम करत असतांनाच सर्व समाजासाठी ही काम केले पाहिजे ह्या संकल्पनेतून आपल्या समाजाच्या कामात खंड न पाडता नियीमित सुरू ठेवता. दिनांक १६/०४/२०२१ पासून सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी एक सामाजिक नवीन प्रवाह हक्काचे व्यासपीठ प्रत्येकासाठी आधारस्तंभ असणारे एक नवीन आक्रमक सामाजिक संघटन सुरू करत आहेत.

दिनांक १६/०४/२०२१ या दिवशी अनिल भाऊ महाजन यांचा जन्मदिवस आहे.आणि त्या दिवसापासून प्रत्येकाला आपले हे स्वतःचे हक्काचे असे सामाजिक व्यासपीठ मिळणार आहे. यासाठी एक सामाजिक प्रवाह देशपातळीवर सुरू करत आहोत. प्रत्येक जण आपल्या स्वतःचा विचार करतो परंतु स्वतःचा विचार करत असताना दुसऱ्याचा विचारही केला पाहिजे. समाजाचाही विचार केला पाहिजे ही भावना डोळ्यासमोर ठेवून काम कसे करावे यासाठी अनिलभाऊ महाजन प्रयत्न करणार आहेत संपूर्ण देशातून कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती त्यांच्या या सामाजिक संघटनेमध्ये भाग घेऊ शकतो.

दिनांक १६/०४/२०२१ रोजी अनिल भाऊ महाजन यांच्या वाढ दिवसाचे औचित्य साधून सर्व जाती समूहाच्या बांधवांसाठी एक नवीन सामाजिक संघटनेची स्थापना करत आहे. या संघटनेचे नाव,लोगो,ध्येय-उद्दिष्ट लवकरच सर्वत्र मीडिया च्या माध्यमातून प्रसारित करण्यात येईल.