मीरीच्या विरभद्र यात्रेतील फडात शेवटची ब्राह्मणे विरुद्ध शिंपणकर यांची आकरा हजाराची कुस्ती बरोबरीत सुटली
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मीरी येथिल विरभद्र यात्रेतील कुस्त्यांच्या फडातील शेवटची आकरा हजाराची कुस्ती ही अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील हिंद केसरी पैलवान अनिल ब्राह्मणे विरुद्ध आणि मीरी येथिल पैलवान दत्ता मच्छिंद्र शिंपनकर यांच्या मध्ये झाली. अटीतटीच्या लढतीत पराभव हा कोणाचाच झाला नाही.शेवटी आखाड्यातील पंचांनी ही कुस्ती बरोबरीत सोडवली.दोघांनाही हे बक्षीस विभागून देण्यात आले. या कुस्ती फडात महिला कुस्तीपटूंच्या ही इनामी कुस्त्या झाल्या.कल्याणी विरुद्ध गीता रजपूत यांच्यात दोन हजार रुपयांची कुस्ती झाली.गीता रजपूत हीने कल्याणीचा पराभव केला.कुस्त्या सोडवण्यासाठी जेष्ठ पैलवान मच्छिंद्र शिंपनकर यांनी विशेष सहकार्य केले. सुत्रसंचलन जगदीश सोलाट यांनी केले.यात्रा कमेटीच्या वतीने नवीन कुस्ती आखाडा तयार करून राज्यातील नामवंत पैलवानांना आमंत्रित करून कुस्त्यांचा हा जंगी हंगामा भरवण्यात आला होता.राहुरीचे हिंद केसरी पुरस्कार मिळवलेले पैलवान गुलाब बर्डे यांचा ही यात्रा कमेटीच्या वतीने सन्मान करण्यात आला.या फडात जिल्ह्यातील घोटण,राहुरी, शेवगाव,नेवासा, पाथर्डी,सोनई, आष्टी,परभणी नांदेड,कर्नाटक येथिल अनेक नामवंत पैलवानांनी हजेरी लावून आपले डाव प्रतिडाव दाखवले होते.विरभद्र मंदिराच्या प्रांगणातील नवीन आखाड्यात हा हंगामा भरवण्यात आला होता.सुरवातीस यात्रा कमिटी सह बिरोबा भक्त सिताराम बाळाजी भगत यांच्या हस्ते नारळ फोडून या हगाम्याची सुरूवात करण्यात आली.या वर्षी तिन दिवस यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.पहिल्या दिवशी छबिना मिरवणूक,दुसऱ्या दिवशी होईक, आणि तिसऱ्या दिवशी कुस्त्यांचा जंगी हंगामा या पध्दतीने तिनं दिवस यात्रा कमेटीच्या वतीने नियोजन करण्यात आले होते.यात्रे निमित्ताने विरभद्र मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.