Home पाचोरा लिनेस क्लब पाचोराच्या माध्यमातून श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे बालसंस्कार शिबिर उत्साहात...

लिनेस क्लब पाचोराच्या माध्यमातून श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे बालसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न

लिनेस क्लब पाचोराच्या माध्यमातून श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे बालसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न

 

 

श्री सु. भा. पाटील विद्यामंदिर, पाचोरा येथे लिनेस क्लब पाचोराच्या माध्यमातून पाचोरा शहरात प्रथमच मोफत बाल संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, शिबिराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कार्यक्रमाची सुरुवात श्रीमती सारिका पाटील मॅडम यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी शिबिराचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना योग्य दिशादर्शन केले. त्यानंतर पालक प्रतिनिधी, रेकी आचार्या तसेच लिनेस क्लबच्या अध्यक्षा प्रा. श्रीमती जयश्रीताई वाघ यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी, श्लोक, सकारात्मक पुष्टीकरण यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले.

शिबिराचे नियोजन लिनेस क्लबच्या सदस्या श्रीमती रुपाली पाटील मॅडम यांनी अत्यंत उत्तमरीत्या केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शिका पत्रकाचे वाटप करण्यात आले. एकूण ३५० विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.

या कार्यक्रमाला भडगाव विभाग प्रमुख श्री दीपक पाटील सर, श्रीमती जयश्री पाटील मॅडम, श्रीमती रुपाली निकम मॅडम, श्रीमती शीतल पाटील मॅडम, श्रीमती चारुशीला पाटील मॅडम, श्री अभिजित महालपुरे सर व श्री आशिष पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना सुट्ट्यांमध्ये काय करावे व काय टाळावे याबाबत स्पष्ट नियमावली देण्यात आली. चांगल्या सवयींचा अंगीकार करण्यावर विशेष भर देण्यात आला. थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे सांगताना, त्यातून शरीर सुदृढ राहते व रोगप्रतिकारक शक्ती वाढते, अशी माहिती देण्यात आली.

बालसंस्कार हे प्रत्येक शाळेत दिले जात असले तरी, या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक स्पष्ट, शास्त्रीय आणि परिणामकारक पद्धतीने मार्गदर्शन मिळाले, अशी भावना पालकांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी शाळेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना कुल्फी देण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.

Don`t copy text!