Home महाराष्ट्र लोळेगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची महंत रामगीरी महाराज येळीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने...

लोळेगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची महंत रामगीरी महाराज येळीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता

लोळेगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची महंत रामगीरी महाराज येळीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता

 

(सुनिल नजन चिफब्युरो स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

शेवगाव तालुक्यातील लोळेगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची येळेश्वर संस्थानचे महंत ह.भ.प.रामगीरी महाराज येळीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता झाली.”गोकुळ एक छोटस खेड आहे.तुकाराम महाराज गोकुळाचे वर्णन करतात त्याचे काय कारण असावे म्हणून गोकुळ सुखी आहे.तुकाराम महाराज सांगतात की गोकुळ ईतके सुखी आहेत की त्याचे गणितही करता येणार नाही.गोकुळात देव आहे.जेथे देव आहे,जेथे संत आहे,येथिल सुखाचे वर्णन करताच येत नाही असे अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील लोळेगाव येथील हनुमान मंदीरात दर वर्षी प्रमाणे ६२ वर्षापासुन चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात महंत रामगीरी महाराज येळीकर यांनी काल्याच्या किर्तना प्रसंगी प्रतिपादन केले.या प्रसंगी किर्तन सेवेसाठी त्यांनी देहु निवासी संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या गौळणीपर अभंगावर विवेचन केले.”गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा.बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी” या गौळणीपर अभंगावर किर्तन केले.संत तुकाराम महाराज हे मथुरेचे , वृंदावनाचे वर्णन करत नाहीत तर छोटेसे खेडे असलेल्या गोकुळचे वर्णन करतात.आनंदाचे प्रतिक म्हणून गोकुळात कथा आहे.कथा ऐकली की जिवनाची व्यथा जात असते.नामस्मरण केल्या नंतर व सत्संग केल्या नंतर अनेक अडचणी दूर होतात.कृष्णाला मारण्यासाठी आलेल्या पुतणा मावशीला भगवंताने मोक्ष दिला.ज्याच्या अंतःकरणात देवाविषयी भाव आहे,ज्याचे अंतःकरण निर्मळ आहे तेथे देव असतो.या सोहळ्यास मृदुंगाचार्य बहिरणाथ महाराज काळे, अविनाश महाराज लोखंडे, विश्वास नवघरे , गायनाचार्य संतोष महाराज चोपडे, दिलिप महाराज सोनवणे, रावसाहेब गायकवाड,भाऊ फटांगरे,विठ्ठल डोंगरे,रघुनाथ नवघरे, नानासाहेब पठाडे,राजेंद्र नवघरे,अर्जुन घनवट,संभाजी पठाडे,चांगदेव नवघरे, बाबासाहेब काळे, सुधिर काळे, यांच्या सह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसादाची पंगत नारायण बाबा काळे चारीटेबल ट्रस्ट तर्फे भानुदास पाटील काळे यांनी दिली.

या सप्ताहात ज्ञानेश्वरी अध्याय वाचन रांजणगाव देवीचे येथिल गणेश महाराज पंडित यांनी केले. या सोहळ्यात सर्व ह.भ.प.उद्धव महाराज सबलस,राम महाराज झिंजुर्के, रामदास महाराज खेडकर, शशिकांत कोरेकर, प्रविण महाराज घायाळ, लक्ष्मण महाराज नांगरे,आदिनाथ महाराज शास्त्री, यांची किर्तने झाली.किरकोळ बाचाबाची वगळता हा सप्ताह शांततेत संपन्न झाला. सामनगाव, जोहरापूर,वडुले बुद्रूक,लोळेगाव येथील भाविक भक्त व भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!