सोयगावात ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी तीव्र
सोयगाव (प्रतिनिधी) दत्तात्रय काटोले
– शेतकऱ्यांच्या हितासाठी शासकीय हमी भावाने ज्वारी खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्या सौ. पुष्पाताई काळे यांनी आज DMO राठोड यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून ज्वारी खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली.
दरम्यान, सोयगाव तहसील कार्यालयातही यासंदर्भात निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार देशमुख यांना खरेदी-विक्री संघाचे संचालक व शहराध्यक्ष मंगेश भाऊ सोहनी, संचालक मयूर मनगटे तसेच कृषी भूषण अरुण भाऊ सोहनी यांनी भेटून ज्वारी खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी केली.
शेतकऱ्यांची ज्वारी मोठ्या प्रमाणावर बाजारात येत असून योग्य दर मिळत नसल्याने त्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
फोटो, दत्तात्रय काटोले

























