Home महाराष्ट्र गावठी कट्ट्याचा धाक दाखवून मोटार सायकल सह पैसे लुटणारे दरोडेखोर पाथर्डी पोलिसां...

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून मोटार सायकल सह पैसे लुटणारे दरोडेखोर पाथर्डी पोलिसां कडून तात्काळ गजाआड

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून मोटार सायकल सह पैसे लुटणारे दरोडेखोर पाथर्डी पोलिसां कडून तात्काळ गजाआड!

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

पाथर्डी शहरातील माणिकदौंडी चौक परिसरात मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक प्रकारात दरोडेखोरांनी गावठी कट्टा दाखवत एका युवकास मारहाण करून दुचाकीसह व रोख रक्कम लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशन पोलिसांनी पाच आरोपींपैकी तिघांना रंगेहाथ पकडून अटक केली असून दोन संशयित आरोपींचा शोध पोलिसा कडून सुरू आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्यां आरोपी पैकी दोघे अल्पवयीन असल्याचे निदर्शनास झाले आहे.या प्रकरणी पोलीसांना

गुप्त खबऱ्या मार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहिती नुसार, अमिर हबिब शेख (वय वर्षे ३४), राहणार. माणिकदौंडी चौक)हे पाथर्डी येथे फ्लेक्स व्यवसाय करतात. त्यांनी २१ फेब्रुवारी रोजी रात्री आपली यामाहा लिबोरो (क्र. एमएच-१६ डब्ल्यू ३३१९) ही मोटार सायकल आपल्या घरासमोर उभी केली होती. ते २२ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास बॅनर लावण्यासाठी बाहेर पडताच त्यांच्या दुचाकीजवळ पाच जण संशयास्पद रीत्या हालचाली करताना दिसुन आले.शेख यांनी त्यांच्या कडे विचारणा केली असता तिघे जण दुचाकीची वायर तोडत असल्याचे दिसून आले.शेख यांनी त्या दरोडेखोरांना विरोध करताच दोघांनी शेख यांना पकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्याच वेळी एका आरोपीने आपल्या कमरेला लावलेला गावठी कट्टा काढून त्यांच्या डोक्याला लावला व गप्प बस नाहीतर गोळी घालीन अशी धमकी दिली.भीतीपोटी शेख खाली बसले असता चोरट्यांनी त्यांच्या खिशातील ६५० रुपये हिसकावून घेतले.त्यानंतर आरोपींनी त्यांची दुचाकी पळवून नेली,तर दोन जण पल्सरवरून पसार झाले.

या घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन दराडे, बाबासाहेब बडे,नारायण बडे,ज्ञानेश्वर इलग,संजय जाधव,इजाज सय्यद,निलेश गुंड,संदीप बडे,संदीप नागरगोजे, भगवान गरगडे, प्रल्हाद निळे या पोलीस पथकाने तातडीने कारवाई करून अनिकेत शामवेल शिंदे (वय २२वर्षे) राहणार शितलानगर, देहूरोड, पुणे, याच्यासह आणखी दोन अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे .

यातील एका सज्ञान आरोपीस न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडून एक गावठी कट्टा,दोन जिवंत काडतुसे आणि दोन चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटार सायकल ही चोरीची असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे साहेब,अपर पोलीस अधीक्षक वैभव कल्लूबर्मे साहेब,शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू साहेब यांच्या मार्गदर्शना खाली आणि पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन दराडे, बाबासाहेब बडे,नारायण बडे,ज्ञानेश्वर इलग,संजय जाधव,इजाज सय्यद,निलेश गुंड,संदीप बडे,संदीप नागरगोजे, भगवान गरगडे, प्रल्हाद निळे यांच्या पोलिस पथकाने केली आहे.पोलिसांच्या या तातडीने केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. पाथर्डी तालुक्यातील अजूनही गुन्हेगारी कारवाया करून राजरोसपणे मोकाट फिरणारे संशयित गुन्हेगार मात्र गुलदस्त्या तच आहेत.

Don`t copy text!