प्रसिद्ध कायदेतज्ञ अँड.मनिषा आढाव आणि त्यांचे पती अँड.राजाराम आढाव यांच्या निर्घृण खूनान संपूर्ण अहमदनगर जिल्हा हादरला? पोलीसांनी पाच पैकी तिघांच्या मुसक्या आवळल्या 

प्रसिद्ध कायदेतज्ञ अँड.मनिषा आढाव आणि त्यांचे पती अँड.राजाराम आढाव यांच्या निर्घृण खूनान संपूर्ण अहमदनगर जिल्हा हादरला? पोलीसांनी पाच पैकी तिघांच्या मुसक्या आवळल्या

(सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा स्पेशल क्राईम रिपोर्टर) अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अॅडहोकेट मनिषा राजाराम आढाव वय(४२) आणि त्यांचे पती अॅडहोकेट राजाराम जयवंत आढाव वय(५२) यांचे दि. २५ जानेवारी रोजी दुपारी राहुरी न्यायालयाच्या आवारातून अपहरण करण्यात आले होते. राहुरी पोलिसात आढाव दाम्पत्य हरवल्याची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती.राहुरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांची भेट घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवण्याची विनंती केली होती.आढाव वकिल हे राहुरीतील कामकाज आटोपून ते अहमदनगर येथील न्यायालयात गेले होते. नंतर त्यांची फियास्ट चारचाकी गाडी क्र.MH 17 JE 2390 ही राहुरी न्यायालयाच्या आवारात बेवारस स्थितीत आढळून आली होती.पहाटे पोलिस तेथे पोहोचले तेव्हा त्यांना आढाव वकील यांच्या गाडीजवळ एक डस्टर गाडी उभी होती.पण पोलीसांची गाडी पाहताच ती गाडी सुसाट वेगाने निघून गेली.पोलीस निरिक्षक संजय ठेंगे यांनी आढाव यांची गाडी ताब्यात घेतली असता त्यांना त्या गाडीत हातमोजे, नायलॉन दोरी, एक बुट मिळून आला होता.तर दुसरी दुचाकी गाडी क्र.MH 17 AW 3207 ही मोटार सायकल न्यायालयाच्या मागिल बाजूस बेवारस स्थितीत आढळून आली होती. मिसिंग तक्रार दाखल करण्यात आल्या नंतर राहुरी पोलीसांनी 9489533326 या क्रमांकावर आढाव दाम्पत्या संदर्भात काही माहिती असल्यास कळवण्याच्या सुचनाही जनतेला देण्यात आल्या होत्या. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखालील भिंगारदीवे, गोसावी,आडबल, गव्हाणे, ससाणे, आढाव, पवार, राठोड,कोल्हे, कोटकर,कुसाळकर या पथकाने संबंधित गाडी ताब्यात घेऊन सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून फुटेज तपासले असता पळून गेलेल्या डस्टर गाडीची माहिती मिळाली. राहुरी तालुक्यातील उंबरे येथील तिघांना ताब्यात घेऊन पोलीसांनी चौदावे रत्न दाखवताच संशयीत आरोपींनी गुन्ह्याची कबुलीही दिली.आरोपींनी 25 जानेवारी रोजी दुपारी आढाव दाम्पत्याचे अपहरण करून त्यांना त्यांच्या राहत्या घरी घेऊन गेले.तेथे दोघांचा रात्रीच्या वेळी कट कारस्थान रचुन खून करून त्यांचे म्रुतदेह दगड बांधून राहुरी तालुक्यातील उंबरे येथील स्मशानभूमीतील विहीरीत टाकून दिल्याचे सांगितले.पोलीसांनी सदर ठिकाणी जाऊन पाहिले असता त्यांना मनिषा आढाव यांच्या शरीराचे चार भाग,तर राजाराम आढाव वकिल साहेब यांच्या अंगावर ही चार पाच ठिकाणी वार केल्याचे दिसून आले. एपीआय लोखंडे, कर्तव्य दक्ष पोलीस अंमलदार चंद्रकांत बर्हाटे, पोलिस काॅं.पालवे , नवगिरे या पोलीसांनी 26 जानेवारी रोजी रात्री प्रेत ताब्यात घेऊन ते अहमदनगर येथील सरकारी दवाखान्यात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले . मनिषा आढाव यांच्या माहेरच्या शेतीच्या वादातून हे खून झाल्याची चर्चा जिल्हा भर सुरू आहे.खुन करणारे हे आढाव यांचे पक्षकार होते वीस हजार रुपयांचे देवाण घेवाणीतून हा प्रकार घडला अशी ही कुजबुज सुरु आहे.या बाबद राहुरी पोलिस स्टेशनमध्ये मयत मनिषा आढाव यांची संगमनेर येथे पानसरे गल्लीत राहणारी बहीण सौ. लता राजेश शिंदे यांनी गुन्हा र.नं.75/2024, कलम 302,201 प्रमाणे अज्ञात व्यक्तीच्या विरोधात दि.27/1/2024 रोजी गुन्ह्याची नोंद केली आहे.प्रसिद्ध कायदेतज्ञ मनिषा आढाव आणि त्यांचे पती अॅडहोकेट राजाराम जयवंत आढाव हे कायद्याचे रक्षक असल्याने त्यांच्या खुनाने संपूर्ण अहमदनगर जिल्हा हादरला असुन पोलीसांनी पाच पैकी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.दोन जन फरार झाले आहेत.संपुर्ण राहुरी तालुक्यासह मानोरी गावावर शोककळा पसरली आहे.