पाचोर्‍याच्या लेकीचे यश कौतुकास्पद : वैशालीताई सुर्यवंशी

पाचोर्‍याच्या लेकीचे यश कौतुकास्पद : वैशालीताई सुर्यवंशी

कर सहायकपदी नियुक्त झालेल्या गरीमा पाटीलचा हृद्य सत्कार

 

पाचोरा, दिनांक १६ (प्रतिनिधी ) : मोठ्या जिद्दीने अभ्यास करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या कठीण परिक्षेत यश संपादन करत कर सहायकपदी नियुक्ती मिळवण्याचे गरीमा पाटील यांचे यश अतिशय कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी काढले. त्या गरीमा पाटीलच्या सत्काराप्रसंगी बोलत होत्या.

 

पाचोरा येथील गरीमा निकित पाटील या तरूणीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण केल्यामुळे तिची कर सहायकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पाचोर्‍याचा लौकीक उंचावणार्‍या या कर्तबगार कन्येचा आज वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत तिचा सत्कार केला. याप्रसंगी गरिमा पाटीलचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतांना यशाचे भरभरून कौतुक करत तिला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

याप्रसंगी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्यासह ज्येष्ठ नेत्या डॉ. अस्मिताताई पाटील, अरूण पाटील, पप्पू राजपूत, अभिषेक खंडेलवाल, राजू काळे, संदीप शिसोदिया, विनोद राऊळ, अजय देवरे, अमोल पाटील यांच्यासह गरीमा आणि त्यांचे वडील निकीत पाटील व आई सुवर्णाताई पाटील आदींची उपस्थिती होती.