Home पाचोरा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था आयोजित “शिक्षक क्रिकेट चषक – 2026 (पर्व...

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था आयोजित “शिक्षक क्रिकेट चषक – 2026 (पर्व तिसरे)” स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था आयोजित “शिक्षक क्रिकेट चषक – 2026 (पर्व तिसरे)” स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार

 

 

पाचोरा, दि. — पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था आयोजित “शिक्षक क्रिकेट चषक – 2026 (पर्व तिसरे)” स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. अंतिम सामन्यात विजेतेपद पटकावणाऱ्या “गुरुजी-11”, भडगाव संघाला संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या हस्ते मानाचा चषक व ₹११,१११/- रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

उपविजेता ठरलेल्या “बाबा-11” संघाला श्री. सुरेश रुपचंद देवरे (मे. आर. बी. सराफ बांबरूडकर ज्वेलर्स) यांच्या हस्ते मानाचा चषक व ₹७,७७७/- देऊन गौरविण्यात आले.

वैयक्तिक पुरस्कार

बेस्ट बॅट्समन: प्रशांत सोळंके

बेस्ट बॉलर: जितेंद्र माने

मालिकावीर: जितेंद्र माने

बेस्ट फिल्डर: भैय्यासाहेब राणे

सामनावीर (संपूर्ण स्पर्धा): जितेंद्र माने

सर्व सहभागी संघ, सामनावीर आणि प्रायोजकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन नानासो. संजय वाघ, व्हाईस चेअरमन नानासो. व्ही. टी. जोशी, ज्येष्ठ संचालक आप्पासो. सतीश चौधरी, गटशिक्षणाधिकारी पाचोरा श्री. विजय पवार, संचालक विपीन पाटील, शशिकांत महालपुरे, भावेश अहिरराव, राकेश पाटील, राजेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, प्रा. चेतन चौधरी, प्रवीण जोहरे, अभिजीत पाटील, प्राचार्य शिरीष पाटील, उपप्राचार्य डब्ल्यू. एस. वले, उपप्राचार्य जे. व्ही. पाटील, डॉ. अमोल जाधव, डॉ. बाळकृष्ण पाटील, सौरभ चिंचोले, शांताराम माने, गणेश देशमुख, विनोद धनगर, नितीन पाटील, मनोहर देसले, माणिक पाटील, कृष्णा साळुंखे तसेच सर्व संघांचे कर्णधार, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक पाटील व योगेश वाणी यांनी केले, तर आभार प्रदर्शन भावेश अहिरराव यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. गिरीश पाटील, आशिष पाटील, स्वप्निल माने, टीचर्स क्रिकेट क्लब, पाचोरा व इतर सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Don`t copy text!