Home पाचोरा श्री.गो. से. हायस्कूलमध्ये शिवछत्रपतींना खडू चित्र साकारून मानाचा मुजरा

श्री.गो. से. हायस्कूलमध्ये शिवछत्रपतींना खडू चित्र साकारून मानाचा मुजरा

श्री.गो. से. हायस्कूलमध्ये शिवछत्रपतींना खडू चित्र साकारून मानाचा मुजरा.

 

 पाचोरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण असताना, पाचोऱ्यातील श्री.गो. से. हायस्कूलमध्ये दर्शनी फलकावर कलाविष्काराच्या माध्यमातून शिवछत्रपतींना आगळीवेगळी मानवंदना दिली. कलाशिक्षक सुबोध कांतायन सर यांनी शालेय दर्शनी फलकावर रंगीत खडूंच्या माध्यमातून आकर्षक छत्रपतींचे व्यक्तीचित्रण सोबतच शिवशंकराच्या पिंडीचे दूधाने अभिषेक करतानाचे चित्रण आणि सुरेख असे घनदाट जंगलाचे निसर्ग चित्रण असा त्रिवेणी संगमाचा कलाविष्कार मांडून शिवरायांना मानाचा मुजरा केला आहे. जंगल हे चित्रकलेत केवळ हिरवळ नसून ते रंगांचे आणि प्रकाशाचे गुंतागुंतीचे मिश्रण आहे.

यात गडद हिरवा-निळा तपकिरी व काळ्या रंगांचा वापर करून झाडांची दाटी, गुढता आणि घनता दर्शवली जाते. या प्रकारच्या चित्रात काजळी, खोलवर प्रकाश-सावलीचा परिणाम, आणि नैसर्गिक पोत यांसारख्या घटकांद्वारे खोली (Depth) आणि दुर्गमता निर्माण केली जाते. कल्पकतेने साकारलेले हे रेखाटन विद्यार्थ्यांचे आणि शिवप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. या अनोख्या कलाकृतीबद्दल आणि शिवरायांप्रति व्यक्त केलेल्या आदराबद्दल पी.टी.सी.संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ,चेअरमन संजय वाघ, मानद सचिव. ॲड.महेश देशमुख, व्हॉइस चेअरमन व्ही. टी.जोशी, शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख,तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन, मुख्याध्यापक एन. आर ठाकरे सर, उप मुख्याध्यापक आर. एल. पाटील सर, पर्यवेक्षक सौ.अंजली गोहीलमॅडम, आर बी. तडवीसर, आर बी. बांठीयासर

कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर, सांस्कृतिक प्रमुख महेश कौडिन्यासर उपप्रमुख रवींद्र बोरसे सर, सर्व पदाधिकारी यांनी सुबोध कांतायन सरांनी केलेल्या फलकलेखनाचे कौतुक केले.याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकबंधुभगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या फलक रेखाटनाला भेट देऊन शिवरायांचे दर्शन घेतले व या कलेची प्रशंसा केली.

Don`t copy text!