जवखेडे खालसा येथे महाशिवरात्री निमित्त त्रिदिनी किर्तन महोत्सवाचे आयोजन!
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
महाशिवरात्री निमित्त संपूर्ण राज्यभर विविध कार्यक्रम साजरे होत असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे वृध्देश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त त्रिदिनी किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हरी भक्त परायण निवृत्ती महाराज मतकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वृद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेरमन उद्धवराव वाघ पाटील यांच्या सहकार्याने या किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या काळात पहाटे ४ ते ६ काकडा भजन, दुपारी बारा ते पाच शिवलिलामृत ग्रंथाचे वाचन,सायंकाळी पाच ते सहा हरीपाठ,रात्री ७ ते ९ हरी किर्तन या प्रमाणे रूपरेषा ठरविण्यात आली आहे.दिनांक १४ फेब्रुवारी रोजी रात्री ह.भ.प. पोपट महाराज कुसमुडे यांचे किर्तन होणार आहे.दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते दहा कावडी मिरवणूक आणि महादेवास जलाभिषेक करण्यात येणार आहे.सकाळी ११ ते १ या वेळेत ह.भ.प.हरीभाऊ महाराज भोंदे यांचे किर्तन होणार आहे.आणि रात्री ७ ते ९ या वेळेत ह.भ.प.ज्ञानेश्वर माउली कराळे महाराज यांचे किर्तन होणार आहे.सोमवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते नऊ ग्रंथ दिंडी मिरवणूक होईल. व नंतर ९ ते११ ह.भ.प.निवृत्ती महाराज मतकर (आळंदी देवाची) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.व नंतर गावातील भाविक भक्त रघुनाथ लांघे यांच्या काल्याच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता होणार आहे.तसेच वरील काळात प्रल्हाद आंधळे,महादेव सरगड, कानिफनाथ विद्यालय कर्मचारी, आदिनाथ वाघ,शरद गवळी यांच्या वतीने अन्नदान करण्यात येणार आहे.तर सरगड,वाघ, आंधळे,मतकर, नवले,भोसले या परीवाराच्या वतीने हरीनाम जागराचा विणा घेऊन पहारा करण्यात येणार आहे.तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

























