धनगर समाजाचा लढा कमजोर करीत असलेल्यांना या लढ्यात बरोबर घ्यायचे की नाही ते तुम्ही राज्य कमिटीने ठरवा, शिर्डीच्या राज्यव्यापी बैठकीत संघर्ष योद्धे दिपकभाऊ बोर्हाडे कडाडले?

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
धनगर समाज एसटी आरक्षण मुक्तीसंग्राम लढा आंदोलनाची राज्य व्यापी बैठक शिर्डी येथे नुकतीच पार पडली.मुंबई येथील आझाद मैदानावर होणाऱ्या ऐतिहासिक राज्यव्यापी धनगर समाज एसटी आरक्षण मुक्ती संग्राम लढ्यातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुर्वतयारी साठी व राज्यस्तरा वरील सर्व नियोजना साठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीस राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे दिप प्रज्वलन करून पूजन करण्यात आले.प्रारंभी प्रास्ताविक अहिल्यानगर जिल्हा नामांतर कृती समितीचे प्रमुख विजय तमनर यांनी केले. त्यांनी २१ जानेवारी रोजी जालना ते मुंबई या दौऱ्यातील एसटी आरक्षण लढ्यात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना सरकारने पोलिस प्रशासनाला पुढे करून कसा त्रास दिला याची सखोल माहिती सांगितली.या दौऱ्यातील आपल्याच समाजातील बिभीषणाची भुमिका बजावणाऱ्या काही घरभेद्यांनी कशी भुमिका बजावली याचा ही सर्व वृत्तांत सांगितला. आपला हा धनगर समाज एसटी आरक्षण मुक्ती संग्रामाचा लढा कमजोर करीत असलेल्यांना या आरक्षण लढ्यात सहभागी करून घ्यायचे की नाही ते तुम्ही राज्य समितीने ठरवा असे संघर्ष योद्धे दिपकभाऊ बोर्हाडे हे जोराने कडाडले होते. तत्पूर्वी राज्यातून आलेले अण्णासाहेब खेमनर(धुळे), पत्रकार सुनिल धनगर (नंदुरबार), रामभाऊ पौंधे (नाशिक),भारत आव्हाड,खंडेराव पाटील,मच्छिंद्र बीडगर (नाशिक), शिवकांत मल्होरे (नांदेड),संतोष गोरे (संभाजी नगर),सतिश देवगुंडे,गजानन काळे (बीड), सर्जेराव जाधव, बोरकर मामा (गेवराई),देवराज फकडे,भगवान हाके(जालना), अशोक पातोड, उत्तर प्रदेश येथुन आलेले शेफर्ड दामू पाल,मंगल पाल,अनिल पाल,योगेंद्र पाल, ठाकूर पाल, महादेव यादव, ज्ञानेश्वर बाचकर, लक्ष्मण पवाडे, विश्वनाथ वाघ, आनंद बनसोडे, छगन पानसरे सर,श्रीराम देशमुख यांनी आगामी मुंबई एसटी आरक्षण आंदोलन लढा पुढे नेण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्या संदर्भात आपले विचार व्यक्त केले. दिपकभाउ बोर्हाडे पुढे म्हणाले की मी धनगर समाजाच्या स्वाभिमानाला कोणत्याही प्रकारचा डाग लागू देणार नाही. मुंबई येथील आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाच्या वेळी सरकारशी चर्चा करण्यासाठी मी पुढे जाणार नाही तुम्ही जा! किंवा त्यांनी उपोषणाच्या स्टेजवर येऊन माईक हातात घेऊन सर्वांसमोर चर्चा करावी.मला नेता होण्याची हौस नाही.प्रत्येक जिल्ह्यात,प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात, नेते तयार झाले पाहिजेत.पण ते घरात बसून नाही तर समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सातत्याने मैदानावरील चळवळीत सहभागी होऊन संघर्ष योद्धे तयार झाले पाहिजेत.मी संपूर्ण राज्यभर संघर्ष यात्रा काढणार आहे.प्रत्येकाने या यात्रेत सहभागी व्हावे.या संघर्ष यात्रेद्वारे प्रत्येक धनगर समाज बांधवां पर्यंत आपण पोहचवू व त्यांच्या भावना जाणून घेऊ आणि ताकदीने लढा उभा करून शंभर टक्के मुंबई येथे जाऊन आंदोलन करू.आंदोलनाची तारीख सर्वानुमते ठरवली जाईल.मात्र धनगर समाजाची दुकानदारी करणाऱ्यांना सोडून सर्व समाज बांधवांना या चळवळीत सहभागी करून घेतले जाईल.आपल्या चळवळीत बीभीषणाची भुमिका बजावणाऱ्या घरभेद्यांना थारा नाही.धनगर समाजातील सर्व स्तरातील नेत्यांना विनंती आहे की तुमची ताकद मोठी आहे. समाजाच्या लढ्याला लपून छपून का होईना आतून ताकद द्या.तुमच्या आमच्या लेकरा बाळासाठी हा लढा आहे.एकट्या दिपक बोर्हाडे साठी नाही.आम्ही कोणाच्याही विरोधात नाही.तुम्ही सर्व तांडा,वाडा,वस्ती वरील समाजात जा,समाजाला जागृत करा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार हा तुमच्या विचारातून तयार झाला पाहिजे.तुम्हाला काम करायची हीच संधी चालून आलेली आहे.प्रत्येक जिल्ह्यात एक आमदार झाला पाहिजे.प्रत्येक विभागात एक खासदार तयार झाला पाहिजे. समाजाच्या चळवळीतून नेते तयार झाले पाहिजेत. आपल्यावर अंन्याय झाला तर त्याला वाचा फोडता येईल.नेता हवेतून तयार होत नाही तर ज्याला नेता व्हायचंय त्यांनी चळवळीत सहभागी झाले पाहिजे.आपल्या भुमिका समजून घ्या,आमच्या भुमिका कोणाच्या विरोधात नाहीत.हा लढा आमच्या लेकरा बाळाच्या कल्याणा साठी आहे.धनगर समाजाच्या नावावर दुकानदारी करणाऱ्यांना मात्र बाजूला ठेवून या मुक्तीसंग्राम लढ्यात सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी केले आहे. शेवटी सर्व राज्यातून आलेल्या सर्व धनगर समाज बांधवांनी दिपक बोर्हाडे यांच्या गळ्यात मोठा पुष्पहार गुंफून सन्मान केला.शिर्डी येथील साई पालखी निवारा या ठिकाणी ही राज्यबैठक संपन्न झाली.त्यावेळी सर्व समाज बांधवांनी अशी शपथ घेतली की आम्ही समाजाच्या नावावर दुकानदारी करणाऱ्यां कोणत्याही व्यक्तीच्या पाठीमागे भरकटत न जाता सर्वजण दिपक भाऊ बोर्हाडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी शपथ घेतली.आणि संपूर्ण राज्यभर संघर्ष यात्रा काढण्या साठी आम्ही सज्ज आहोत अशी ग्वाही दिली.सुत्र संचालन वधुवर सुचक स.मि.ना. कोळपे यांनी केले.आभार शिर्डी येथील समाज बांधवांनी मानले.

























