पाचोऱ्यात महाशिवरात्री निमित्त हनुमंत शिवमहापुराण कथा
पाचोरा – आदिशक्ती कुलस्वामिनी पेडकाई मातोश्री व महादेवाच्या आशीर्वादाने स्व. शांताराम माधवराव पाटील यांच्या स्मरणार्थ महाशिवरात्री निमित्त हनुमंत शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे.
ही कथा दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ ते २१ फेब्रुवारी २०२६ दरम्यान दररोज दुपारी २ ते ५ या वेळेत होणार आहे. कार्यक्रमाचे ठिकाण जागृत महादेव मंदिर, संत गाडगेबाबा नगर, रेल्वे उडाण पुलाजवळ, भडगाव रोड, पाचोरा असे आहे.
कार्यक्रमादरम्यान
२० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता हनुमंत याग
महाआरती सकाळी ९ वाजता व सायंकाळी ६ वाजता
22 फेब्रुवारी २०२६ रोजी काल्याचे कीर्तन व महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे.
या कथेसाठी राष्ट्रीय कथाकार महंत प्रा. ह. भ. प. डॉ. सुनीलजी महाराज विटोलेकर (M.Pharmacy / PhD) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन ग. भा. लताबाई शांताराम पाटील, श्री. रवींद्र शांताराम पाटील, श्री. प्रविण शांताराम पाटील, श्री. मनोज शांताराम पाटील तसेच त्यांच्या परिवारियांच्या वतीने करण्यात आले आहे.
भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवमहापुराण कथेस उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.























