जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची गटविकास अधिकारी कार्यालयास क्षेत्रभेट
दत्तात्रय काटोले
सोयगाव :
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सोयगाव येथील इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी सोयगाव येथील गटविकास अधिकारी कार्यालयास शैक्षणिक क्षेत्रभेट देत कार्यालयामार्फत सुरू असलेल्या विविध कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
या प्रसंगी गटविकास अधिकारी एस. आर. यमुलवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत कार्यालयांतर्गत असलेल्या १३ विभागांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे देत प्रशासनाची कार्यपद्धती समजावून सांगितली. विद्यार्थ्यांनी कार्यालयातील प्रत्येक टेबलला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांच्या कार्याची प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली.
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी तातेराव माळी, पैठणे साहेब, महेंद्रसिंग पाटील यांनीही विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करत क्षेत्रभेट उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व शाळेचे कौतुक केले.
या क्षेत्रभेटीप्रसंगी गटविकास अधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी, गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी भिकन पाटील, शाळेचे मुख्याध्यापक किरणकुमार पाटील, वर्गशिक्षिका मंगला बोरसे, वर्गशिक्षक रामचंद्र महाकाळ तसेच बिलाल बागवान उपस्थित होते.
या शैक्षणिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रशासकीय कामकाजाची प्रत्यक्ष ओळ
फोटो :दत्तात्रय काटोले

























