पाचोऱ्यात युवासेना ऑनलाईन प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान

युवासेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान.युवा तेथे सेना

आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशाने,सचिव वरूनजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर ऑनलाइन प्राथमिक सदश्यता नोंदणी अभियान सुरू आहे.याचाच भाग म्हणून पाचोरा युवासेना तर्फे शहरात व ग्रामीण भागात सदश्यता नोंदणी अभियान उपक्रम राबवण्यात येणार आहे.शहरात २६ एप्रिल ,मंगळवार रोजी सकाळी ठीक 10 ते 1 यावेळी महाराणा प्रताप चौक व शिवसेना मध्यावर्ती कार्यालय या दोन ठिकाणी नोंदणी करण्यात येईल.सदर नोंदणी ऑनलाइन असल्यामुळे बॅनर वरील QR कोड स्कॅन करून किंवा www.joinyuvasena.com.या लिंक वर जाऊन पण आपण सदश्य होऊ शकतात.सदश्य झाल्यावर आपल्याला लागलीच आदित्य साहेबांच्या सही चे ओळख पत्र ऑनलाइन डाउनलोड करता येईल .युवासेना ही युवकांच्या प्रश्नांवर काम करणारी ,त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमात्र संघटना आहे,युवकांना समाजकारणात संधी देऊन त्यांना व्यक्त होण्यास व्यासपीठ देणारी संघटना आहे, विविध कला कौशल्य,शैक्षणिक उपक्रम राबवणारी संघटनाआहे ,समाजाचं ही काही देणं लागत या हेतूने जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा व विकासात्मक,सकारात्मक राष्ट्रनिर्मिती मध्ये आपले योगदान द्यावे .
राजकारणावर नको ,विकासावर बोलूयात- सुमित किशोर आप्पा पाटील जितेंद्र जैन- युवासेना उपजिल्हाप्रमुख
सौरभ चेडे-मा.तालुकाप्रमुख ,
संदीप राजे पाटील-मा.शहरप्रमुख ,
अनिकेत सूर्यवंशी -मा.शहरप्रमुख