भडगाव येथे शेतीशिक्षणाचे मार्गदर्शन राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियानांतर्गत आयोजन

भडगाव (ता. भडगाव), दि. १२ डिसेंबर २०२५ :
भडगाव शिवार येथे राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियानांतर्गत कृषि विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प क्रॉपसॅप (CROPSAP) अंतर्गत मका पिकावरील शेतीशाळा उत्साहात पार पडली.
सदर कार्सक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन कुमारी काजल भाऊसाहेब ढोकळे, सहाय्यक कृषी अधिकारी भडगाव यांनी केले. कृषि अधिकारी सुखदेव गिरी यांनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे महत्त्व आणि बीज प्रक्रिया कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवले. तसेच विविध योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शनही केले. उप कृषी अधिकारी भडगाव मंडळ एम. जे. वाघ यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची सविस्तर माहिती दिली. सहाय्यक कृषी अधिकारी रेखा बनसोडे (गिरड) यांनी महिलांना विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले. सहाय्यक कृषी अधिकारी ललित देवरे यांनी शेतकऱ्यांसोबत कविता सादर करून कार्यक्रमात उत्साह निर्माण केला आणि उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली ,तसेच
कार्यक्रम यशस्वीरित्या पारपाडण्यासाठीसौ मीना अशोक बाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शेतीशाळेदरम्यान महिलांनी शेतातील मका पिकाची निरीक्षणे नोंदवून त्यांची चित्रात्मक नोंदही स्वतःच्या हस्ताक्षरात केली, ही उपक्रमाची विशेष बाब ठरली. खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात भडगाव शिवारातील ही मका पिकाची शेतीशाळा खरोखरच उल्लेखनीय ठरली.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी अजयकुमार साळुंखे, शुभम बंगाळे, सिद्धेश्वर सावंत आणि सौरभ दुगड यांनी मोलाचे सहकार्य केले.

























