नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी शहरात विनापरवाना दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी गाडीसह रंगेहाथ पकडले

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी शहरात विनापरवाना दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी गाडीसह रंगेहाथ पकडले

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सर्व अहिल्या नगर जिल्हाभर सुरू असताना दिनांक 30/11/2025 रोजी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती की राहुरी शहरातून स्विफ्ट गाडीमधून देशी विदेशी दारूची अवैध वाहतूक होणार आहे.पोलिस निरीक्षक ठेंगे साहेब यांनी पोलिसांना तशा प्रकारच्या सूचना देऊन सदर ठिकाणी तात्काळ पोलीस पथक पाठवून गाड्यांची नाकाबंदी केली होती.सदर सूचनेप्रमाणे राहुरी पोलीस पथकाने राहुरी शहरातील प्रगतीशाळा परिसरात सापळा रचून सदर संशयित स्विफ्ट कार ताब्यात घेऊन कारची तपासणी केली असता सदर गाडीत देशी दारूच्या 48 बाटल्यांचा एक बॉक्स व 12 बियर बाटल्यांचा दुसरा बॉक्स असे दोन विनापरवाना दारूचे बॉक्स गाडीत मिळून आले. सदर 6800 रुपये किमतीची दारू व 2,50,000 हजार रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर गाडी असा एकूण 2,56,000/ रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसा कडून जप्त करण्यात आला आहे.सदर गाडी वरील चालक नामे विजय सोमनाथ मगर,(वय वर्षे 42) रा. श्रीरामपूर याचे विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 1324/2025 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे राहुरी पोलीस स्टेशनच्या डायरीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे साहेब, मा .अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने केलेली आहे.नेमका निवडणुकीच्या आखाड्यात हा दारूसाठा सापडल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. हा दारू साठा एखाद्या राजकीय पार्टीचा तर नाही ना याची पोलिसांकडून कसुन चौकशी सुरू आहे.ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा दारू साठा सापडल्याने तळीरामांचे चांगले च धाबे दणाणले आहेत.