पाचोरा येथील माजी नगरसेविका हर्षाली जडे यांचे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना निवेदन

पाचोरा येथील माजी नगरसेविका हर्षाली जडे यांचे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना निवेदन!

 

पाचोरा 17,2023  माझ्या प्रभागातील थांबविण्यात आलेल्या कामांबाबत लवकर निर्णय नाही घेतला तर आंदोलन करणार नगरसेविका हर्षाली दत्तात्रय जडे यांचा न. पा.प्रशासनला इशारा

माझ्या प्रभागातील माझ्या कार्यकाळात मंजूर असलेली व निधीची तरतूद असलेली खालील कामे अनेक महिन्यांपासून थांबविण्यात आलेली आहे. अनेकवेळा तोंडी व लेखी मागणी करुन सुध्दा कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे व स्थानिक नागरीकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरु आहे. माझ्या प्रभागातील प्रलंबीत कामे पुढीलप्रमाणे-  देशमुखवाडी भागातील बालोद्यान सुशोभिकरण व बाजुचे रस्ते.पंचमुखी हनुमान मंदीर ते आठवडे बाजार रस्ता काँक्रीटीकरण करणे. पिंजारवाडा भागातील रस्ते काँक्रीटीकरण करणे. कलालगल्ली व जवळील भागांचे रस्ता काँक्रीटीकरण करणे.ठाकूरवाडा भागातील रस्ता काँक्रीटीकरण करणे.तरी माझी आपणांस विनंती आहे की, सदरची कामे त्वरीत सुरु करण्यात यावी. अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल याची नोंद घ्यावी.