निर्मल इंटरनॅशनल स्कूलची श्रेया महालपुरे चमकली! विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड..!

निर्मल इंटरनॅशनल स्कूलची श्रेया महालपुरे चमकली! विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड..!

 

पाचोरा:-क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या विद्यमाने तथा जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव यांच्या मार्फत आयोजित जिल्हास्तर शालेय कॅरम स्पर्धेत निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या कु. श्रेया विनोद महालपुरे हिने १७ वर्षे वयोगटात उल्लेखनीय कामगिरी सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या झळाळत्या यशामुळे आता ती नाशिक येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

श्रेयाच्या या यशाने संपूर्ण शाळा परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थेच्या अध्यक्षा मा. वैशालीताई सुर्यवंशी, सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य श्री. गणेश राजपूत, जनसंपर्क अधिकारी श्री. आय. बी. सिंग, उपप्राचार्य श्री. प्रदिप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील व प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष पाटील यांनी श्रेयाचे मन:पूर्वक अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या यशामागे क्रीडा शिक्षक श्री. गणेश मोरे, श्री. नंदू पाटील, श्री.प्रवीण मोरे व श्री. सोमनाथ माळी यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा असून, त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ श्रेयाने विभागीय पातळीवरील संधीच्या रूपाने प्राप्त केले आहे.

श्रेयाच्या या कामगिरीमुळे निर्मल इंटरनॅशनल स्कूलने पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात आपली गुणवत्ता आणि प्राविण्य सिद्ध केले आहे.