खानदेशातील सुप्रसिद्ध सर्जन डॉ. जगमोहन छाबडा यांचे चिरंजीव मनन सिंग यांना एमजीएम मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी प्रवेश
वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक छाबडा दाखल; खानदेशातून अभिनंदनाचा वर्षाव
सोयगाव, ता. २४ : खानदेशातील प्रसिद्ध सर्जन आणि समाजसेवक डॉ. जगमोहन छाबडा यांचे चिरंजीव मनन सिंग जगमोहन छाबडा यांचा वैद्यकीय शिक्षणासाठी प्रतिष्ठित एमजीएम मेडिकल कॉलेज, छत्रपती संभाजीनगर येथे एमबीबीएस अभ्यासक्रमात यशस्वी प्रवेश झाला आहे. त्यांच्या या यशामुळे वैद्यकीय क्षेत्रात छाबडा कुटुंबाची दुसरी पिढी दाखल झाली असून, संपूर्ण खानदेशातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मनन सिंग यांनी शालेय जीवनात उत्कृष्ट शैक्षणिक यश प्राप्त केले असून, वैद्यकीय प्रवेश परीक्षेतही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या यशाबद्दल जळगाव आरोग्य धूत समितीचे अध्यक्ष दिगंबर वाघ, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय शहापूरकर, उपाध्यक्ष डॉ. दिनेश पंडित, तसेच डॉ. रघुनाथ फुसे, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. संभाजी पाटील, डॉ. जाधव, डॉ. अजय वाडेकर यांनी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
यासोबतच, जळगाव मेडिकल असोसिएशन व डॉ. असोसिएशनतर्फे देखील मनन सिंग छाबडा यांचे विशेष सत्कार व अभिनंदन करण्यात आले. छाबडा कुटुंबाची वैद्यकीय क्षेत्रातील परंपरा पुढे चालवण्यासाठी मनन सिंग सज्ज झाले असून, त्यांच्याकडून भविष्यात आरोग्यसेवेत उल्लेखनीय योगदान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.