कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचा 28 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
पिंपळगाव रे. (श्री महेंद्र बेराड |भोकरदन तालुका प्रतिनिधी) :
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचा 28 वा वर्धापन दिन पिंपळगाव रेणुकाई येथील श्री. वसंतदादा देशमुख बी.ए. सिव्हिल सर्व्हिसेस कॉलेज या संलग्नित महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठाच्या ध्वजारोहणाने झाली. ध्वजारोहण महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. व्ही. आर. देशमुख यांनी केले. यावेळी रेणुकादेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. वसंतरावजी दादा देशमुख, सचिव श्री. भास्करराव तात्या देशमुख, कोषाध्यक्ष श्री. बबनराव गाढे, उपाध्यक्ष श्री. अरुणभाऊ देशमुख, संचालक श्री. बालासाहेब गाढे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्रा. ए. जी. सदाशिवे यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. महाविद्यालयातील प्रा. जी. पी. पांडे, प्रा. आर. डी. खराटे, प्रा. सौ. एस. एस. मापारी, प्रा. सागर गजानन गाडेकर तसेच कार्यालयीन अधीक्षक श्री. विनोद बबनराव देशमुख आदी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. सौ. ए. सी. देशमुख यांनी केले.