पाचोऱ्यातील गणेशउत्सवात ‘एक शाम शहीदों के नाम’ शहीदांना समर्पित कार्यक्रम
पाचोरा सार्वजनिक गणेशउत्सवात मंडळात ‘एक शाम शहीदों के नाम’ शहीदांना समर्पित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीचीं आरती झाल्यावर भाविकांनी दिवा पेटवून शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यात आली.
पाचोरा पुनगाव परिसरातील राधाकृष्ण माऊली नगरच्या सार्वजनिक गणेशउत्सवात मंडळाच्या कार्यक्रमात शहीद जवानांना समर्पित देशभक्तीपर गाणे गाऊन ‘एक शाम शहीदों के नाम’ शहीद जवानांना समर्पित श्रद्धांजली वाहण्यात आली, या कार्यक्रमात उपस्थित नागरिक भावनिक झाले होते. शहीदांबद्दल आदर आणि सैनिकांबद्दल कृतज्ञतेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत होते, परिसरातील लहान बालके, महिलांचा मोठया प्रमाणात सहभागी झाले होते.
विशेष असे की या परिसरात अनेक आजी माजी सैनिक वास्तव्यास राहत असूनही काही सैनिकही सुटी वर आले होते ते सैनिक भावनिक झाल्याचे दिसून आले. राधाकृष्ण माऊली नगरच्या सार्वजनिक गणेशउत्सवाचे हे आठवे वर्ष असून दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.