श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथील विद्यार्थिनीचे शासकीय जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश
(पाचोरा तालुका) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा. येथील इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी राजनंदनी भीमराव खरे ही शासकीय जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाली असून जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत ती पात्र ठरली. तिचे मुख्याध्यापक नरेंद्र पाटील यांनी सत्कार केला. यावेळी तिचे पालक भीमराव खरे व आई सुवर्णा खरे उपस्थित होते. पर्यवेक्षिका अंजली गोहिल. पर्यवेक्षक रहीम तडवी. ज्येष्ठ शिक्षक प्रीतम सिंग पाटील, वर्गशिक्षक विजय पाटील, सागर पाटील मयूर देवरे प्रशांत पाटील रवींद्र जाधव, व
विशाल बागुल उपस्थित होते.

























