पाडळी येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या वर स्वतंत्र दोन गुन्हे दाखल ३३,८४० रुपयाची दारू जप्त

पाडळी येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या वर स्वतंत्र दोन गुन्हे दाखल ३३,८४० रुपयाची दारू जप्त

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनी ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे खुलेपणाने सूरु असल्याचे दिसून आल्यास संबंधित पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकावरच कारवाईचा बडगा उगारला जाईल असा इशारा जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनला प्रसार माध्यमांद्वारे जाहीर केल्या मुळे जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खडबडून जागे झाले आहेत.आपल्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत कुठे कुठे अवैध धंदे सुरू आहेत याची कसून चौकशी करून धाडी टाकून आरोपींच्या मुसक्या आवळत आहेत.अशीच एक अवैध दारू विक्रेत्या वरील पोलिस कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथील शिवारातील दारू विक्रेत्या विरोधात करण्यात आली आहे. या बाबतची माहिती अशी की दिनांक १८ जुलै रोजी रात्री दहा वाजता पाथर्डी पोलीसांची गाडी पेट्रोलींग करीत असताना पाडळी येथील शिवारातील रावसाहेब बाबुराव फुलमाळी आणि सिन्नप्पा बाबुराव फुलमाळी हे दोघे जण वेगवेगळ्या ठिकाणी अवैध दारू विक्री करीत असलेले पेट्रोलींग करणाऱ्या पोलीस पथकास आढळून आले.रावसाहेब बाबुराव फुलमाळी यांच्या राहत्या घरी दोन पोलिस पथकासह छापा टाकला असता १५,३६० रुपये किंमतीची देशी विदेशी कंपनीची दारू मिळून आली या बाबत पाथर्डी पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ७८३/२०२५ मु.प्रो.कायदा कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसरा छापा सिन्नप्पा बाबुराव फुलमाळी यांच्या राहत्या घरी टाकला असता तेथे १८,४८० रुपये किंमतीचा देशी विदेशी कंपनीचा अवैध दारू साठा मिळून आला आहे.या बाबद पाथर्डी पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ७८५/२०२५ म.प्रो.कायदा कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील दोन्ही आरोपीच्या विरोधात वेगवेगळ्या गुन्ह्या अन्वये एकुण ३३,८४० रुपये किंमतीचा देशी विदेशी कंपनीचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला आहे.आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात आली आहे.सदरची ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक कलुबर्मे साहेब, शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब,पोलिस सब इन्स्पेक्टर विलास जाधव,पोलिस कॉन्स्टेबल संजय जाधव,सागर बुधवंत, ज्ञानेश्वर ईलग,ईजाज सय्यद आणि महिला पोलिस कॉन्स्टेबल मनिषा धाने यांच्या पोलिस पथकाने केली आहे.त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.एकीकडे जिल्हा पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे साहेब यांनी अवैध धंद्याविरोधात कारवाईचा बडगा उगारून अवैध मार्गाने व्यवसाय करणाऱ्यांची पळता भुई थोडी केली आहे.तर दुसरीकडे अनेक पोलिस स्टेशनच्या हद्दीत कुठे कुठे अवैध धंदे करणारे आहेत त्यांची धाडी टाकून उचलबांगडी सुरू आहे.काही अवैध मार्गाने व्यवसाय करणारे पुढील दुकान बंद ठेवून मागच्या दाराने खुलेआम दारू विक्री करीत आहेत. पोलीसांना क्यु आर कोड द्वारे ऑनलाईन पद्धतीने सर्वेक्षण करून सर्व माहिती पीडीएफ फाईल मध्ये मिळत आहे. त्याच आधारावर जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी छापेमारी करीत आहेत.