अध्यात्माच्या नावाखाली सुनिता आंधळे व प्रविण आंधळे यांनी आळंदीतील खोलीत डांबून ठेवलेल्या पिडीतेवर बळजबरीने शरीरसंबंध ठेवणाऱ्या आरोपीस चार दिवस पोलिस कोठडी
(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) अध्यात्माच्या नावाखाली संशयित आरोपी सुनिता आंधळे आणि प्रविण आंधळे यांनी आळंदीतील खोलीत डांबून ठेवलेल्या पिडीतेवर बळजबरीने शरीरसंबंध ठेवणाऱ्या आरोपीस चार दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे. याबाबतची घटना अशी की दिनांक ८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत असे नमूद करण्यात आले आहे की संशयित आरोपी अण्णासाहेब उर्फ तानाजी प्रल्हाद आंधळे,त्यांचे नातेवाईक जनाबाई प्रल्हाद आंधळे, प्रविण प्रल्हाद आंधळे, सोनेसांगवी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांनी आणि एका अनोळखी गाडीवरील चालकाने पिडीत मुलीला २ जुलै २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता लग्नाचे आमिष दाखवले.त्या नंतर गाडी क्रमांक एम एच ४३ सीसी ७८१२मध्ये पिडीतेला बळजबरीने बसवून तीला पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील आळंदी येथील एका वारकरी शिक्षण संस्थेत नेले.ती मुलगी बळजबरीने गाडीत बसत नसल्याने तीला आरडाओरडा केला तर तोंडावर ॲसिड टाकून चेहरा विद्रूप करण्याची धमकी दिली.आळंदीत नेल्यावर सुनिता आंधळे आणि प्रविण आंधळे यांनी पिडीत मुलीला आणि संशयित आरोपीला एका खोलीत डांबून ठेवण्यात आले.याच काळात आरोपी अण्णासाहेब उर्फ तानाजी प्रल्हाद आंधळे यांनी पिडीत मुलीशी बळजबरीने शरीरसंबंध ठेवले.या आशयाची फिर्याद पिडीतेने अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ५९७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ६४,१२७(२), ८७,३(५) प्रमाणे दाखल केली होती.आणि वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रसार माध्यमांद्वारे पिडीतेच्या वडिलांनी सारी आपबिती मिडीया समोर सांगितली होती.या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात अध्यात्मिक क्षेत्रात प्रचंड प्रमाणात खळबळ उडाली होती.मुलींना अध्यात्माचे धडे देणाऱ्या आळंदीतील या वारकरी शिक्षण संस्थेच्या गैर कारभाराचे राज्यभर चांगलेच धिंडवडे आणि वाभाडे निघाले होते.प्रसार माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्याने शेवगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी या संशयित आरोपीच्या तपासासाठी स्वतंत्र दोन पोलिस पथके तयार करून ती राज्यभर तपासासाठी रवाना केली होती.गेले एकवीस दिवस पोलिसांना गुंगारा देत आरोपी अण्णासाहेब उर्फ तानाजी प्रल्हाद आंधळे हा पुणे,अहिल्यानगर, संभाजी नगर,जालना या जिल्ह्यात जागा बदलूण पलायन करीत होता.२६ जुलै रोजी शेवगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती की सदर आरोपी हा ट्रकमध्ये बसून धुळे येथुन मध्यप्रदेश मध्ये फरार होण्याच्या मार्गावर आहे. ही माहिती मिळताच शेवगाव पोलिसांनी धुळे येथील पोलीसांशी संधान साधून आरोपी अण्णासाहेब उर्फ तानाजी प्रल्हाद आंधळे याच्या २७जुलै रोजी मुसक्या आवळून शेवगाव येथे आणले. येथील न्यायालयासमोर त्याला हजर केले असता न्यायालयाने त्याला ३० जुलै २०२५पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब हे करीत आहेत.या गैरप्रकारामुळे आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या पालकांमध्ये प्रचंड प्रमाणात घबराट निर्माण झाली आहे.या प्रकारामुळे अनेक मुलींना या ठिकाणी शिक्षण घेणं अवघड झाले आहे.या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आळंदी पोलिस नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या संस्थेत अध्यात्माचे धडे देणाऱ्या सुनिता आंधळे म्हणतात की मी या प्रकरणी अजिबात दोषी नाही. त्यांचे अगोदरच हे प्रकरण चालू होते. पोलिस निरीक्षक मुटकुळे साहेब यांनी मात्र दुध का दुध आणि पाणी का पाणी हे सीद्धच करणार असल्याचे सांगितले.