पाचोरा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत सभा संपन्न

पाचोरा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत सभा संपन्न

 

 

आज रोजी श्री एस एस एम एम महाविद्यालय पाचोरा येथे सन २०२५/२६ मध्ये होणाऱ्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेबाबत क्रीडा शिक्षकांची सभा संपन्न झाली या सभेच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री प्रा एस एस पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक श्री एन आर ठाकरे सर महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री प्रा जे पी बडगुजर तालुका क्रीडा समन्वयक प्रा गिरीष पाटील मुख्याध्यापक सुरवाडे सर मुख्याध्यापक धोनी सर मुख्याध्यापक पिंजारी सर हे उपस्थित होते तसेच तालुका क्रीडा समिती सदस्य श्री गणेश पाटील सर श्री एस के पाटील सर श्री सुभाष राठोड सर श्री प्रा वाल्मीक पाटील उपस्थित होते मान्यवरांच्या स्वागतानंतर श्री गणेश पाटील सर , श्री गजानन सोमवंशी सर यांची मुख्याध्यापक पदी नेमणूक झाली तसेच श्री चंद्रभान शिंदे सर यांची RSP म्हणून निवड झाल्याबद्दल व तसेच स्पोर्ट्स कोठ्यातून महाविद्यालयात नियुक्त झालेल्या प्राध्यापिका ऋतुजा जोशी यांचा क्रीडा समितीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

क्रीडा शिक्षक हा शाळेचा आत्मा आहे हे अधोरेखित करून आजचा विद्यार्थी आणि मोबाईल या सामाजिक प्रश्नावर आपले विचार तसेच क्रीडा स्पर्धा या निपक्षपाती पणे घेतले जाव्यात असे आव्हान प्रमुख पाहुणे श्री एन आर ठाकरे यांनी मनोगतातून व्यक्त केले त्यानंतर तालुका क्रीडा समन्वयक प्रा गिरीश पाटील यांनी सन 2025/26 मध्ये होणाऱ्या तालुकास्तरीय विविध 10 क्रीडा प्रकाराच्या स्पर्धाबाबत माहिती देत शाळा, खेळाडू व संघ नोंदणी,खेळाडू इम्पोर्ट,मागील वर्षाची प्राविण्य प्रमाणपत्र डाऊनलोड करणे व विविध खेळांचे नियम याबाबतचे मार्गदर्शन केले तसेच विविध खेळात जास्तीत जास्त शाळा व महाविद्यालय यांनी सहभाग नोंदवावा या बाबतचे आव्हाहन केले. क्रीडा सभेसाठी तालुक्यातील अनेक क्रीडा शिक्षक व भगिनी उपस्थित होते व सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री सुभाष राठोड सर यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा वाल्मीक पाटील यांनी केले.