पाचोरा येथील भारतीय नगर मधून निघालेली रमाई माता मिरवणूक उत्साहात

पाचोरा येथील भारतीय नगर मधून निघालेली रमाई माता मिरवणूक उत्साहात

( पाचोरा प्रतिनिधी )
पाचोरा येथील भारतीय नगर येथून निघालेली रमाई माता मिरवणूक आठवडे बाजार रथ गल्ली गांधी चौक जामनेर रोड श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक.ते प्रकाश टाकी चौक देशमुख वाडी व पुन्हा भारतीय नगर येथील अगदी उत्साहात डीजेच्या तालावर नाचून आनंद उत्सव साजरा केला या मिरवणुकीत माजी नगरसेवक भूषण वाघ.यांनी मिरवणुकीत सामील होऊन आनंद व्यक्त केला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मिलिंद नगर नागसेन नगर तसेच विविध भागातील तरुण व महिलांनी भाग् घेऊन आनंद साजरा केला तसेच यावेळी पाचोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री धरम सिंग सुंदर डे व पोलीस उपनिरीक्षक श्री योगेश गणगे साहेब सर्व पोलीस कर्मचारी महिला पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला.