पाचोरा कठीण परिश्रमातून यश प्राप्ती निश्चित केतनकुमार पाटील

पाचोरा कठीण परिश्रमातून यश प्राप्ती निश्चित केतनकुमार पाटील

 

पाचोरा श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा अंतर्गत स्पर्धा परीक्षा मंडळ व द युनिक अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी महाविद्यालयात पदवी काळात स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी या विषयावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून केतनकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असेल त्यावेळेस त्याच्या कुटुंबाची साथ त्याला असणे तितकेच महत्त्वाचे असते कुटुंब पाठीशी भक्कम उभे राहिल्याशिवाय विद्यार्थी यश प्राप्त करू शकत नाही स्पर्धा परीक्षा देत असताना अनेकदा अपयशांना सामोरे जावे लागत असते अशा काळात मार्गदर्शक व कुटुंब हे विद्यार्थ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असते असे प्रतिपादन श्री पाटील यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो.डॉ. वासुदेव वले होते यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष पाटील यांनीही विद्यार्थ्यांना या वेबिनारसाठी शुभेच्छा दिल्या या विभिनारचे आयोजन स्पर्धा परीक्षा मंडळाचे प्रमुख प्राध्यापक डॉ माणिक पाटील यांनी केले होते यावेळी युनिक अकॅडमी पुणे चंद्रकांत खराटे महाविद्यालयातील प्रा एस बी तडवी प्रा के एस इंगळे प्रा वाय बी पुरी प्रा राजेश वळवी प्रा स्वप्निल पाटील स्वप्निल भोसले डॉ क्रांती सोनवणे प्रा शरद पाटील प्रा.अमित गायकवाड प्रा.विशाल पाटील प्रा.नितीन पाटील,प्रा. संजिदा शेख,प्रा.रोहित पवार, नदीम देशमुख आदी सर्व उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ माणिक पाटील यांनी केले तर आभार डॉ के एस इंगळे यांनी मानले.