सामनेर ग्रामपंचायत उपसरपंचपदी श्री महेंद्र साळुंखे बिनविरोध निवड 

सामनेर ग्रामपंचायत उपसरपंचपदी श्री महेंद्र साळुंखे बिनविरोध निवड

 

 

सामनेर ता पाचोरा

सामनेर ग्रामपंचायत उपसरपंचपदी श्री महेंद्र मोतीलाल साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सभेचे अध्यक्षस्थानी सरपंच सौ संगीता भोलेनाथ भिल होत्या. मावळते उपसरपंच सौ पूनम राजेंद्र साळुंखे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर निवड करण्यात आली. एकमेव अर्ज असल्याने निवडणूक बिनविरोध करण्यात आली. यावेळी सरपंच संगीता भिल

ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण पाटील, रविंद्र साळुंखे , पूनम साळुंखे ,, मालुबाई पाटील , मनिषा पाटील उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले यावेळी भोलेनाथ भील, श्र साहेबराव पाटील. भालचंद्र चव्हाण, राजेंद्र साळुंखे, मुकेश सोनकूळ यशोदीप पाटील , श्री सुनील साळुंखे, श्री प्रशांत साळुंखे , श्री प्रमोद पाटील श्री बाळकृष्ण साळुंखे ,श्री शिवाजी चव्हान, श्री मकरंद पाटील, प्रशांत सूर्यवंशी , ऋषिकेश नेरपगार यांनी शुभेच्छा दिल्या.

त्याच्या निवडीबद्दल तुळजाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री डी.एम.पाटील, यांनी अभिनंदन केले. छायाचित्र उपसरपंचपदी निवड झालेलेले श्री महेंद्र साळुंखे सरपंच संगीता भिल, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.