शिक्षण विस्तार अधिकारी विशाल धांडे यांचा उर्दू शाळे तर्फे सत्कार

शिक्षण विस्तार अधिकारी झालेले विशाल धांडे यांचा उर्दू शाळे तर्फे सत्कार

जि.प.उर्दू कन्या शाळा पाचोरा येथे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी सकाळी साडेसात वाजता कृतीशील शिक्षक विशाल धांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.विशाल धांडे, यांनी नाशिक जिल्हा परिषदेची शिक्षण विस्तार अधिकारी( श्रेणी 2) ची परीक्षा उत्तीर्ण केली. तेथे रुजू होण्यापूर्वी त्यांचे जि.प.उर्दू कन्या शाळा पाचोरा तर्फे सत्कार करण्यात आला. गोराडखेडा उर्दू केंद्रप्रमुख शेख कदीर शब्बीर यांनी महाराष्ट्र दिवसाची विशेषता व इतिहास सांगितला. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी झालेले विशाल धांडे यांनी आपले वैयक्तिक जीवन, शैक्षणिक उतार चढाव, अभ्यासाची पद्धत, शैक्षणिक प्रवासात येणारी अडचण व त्याचे निराकरण यावर प्रकाश टाकला. विशाल धांडे यांनी M.A, M.ED, M.PHIL, NET, SET एवढं उच्च शिक्षण मिळवले असून त्यांची राज्यघटना या विषयात PHD सुरू आहे.तसेच शिक्षण विस्तार अधिकारी पदावर समाधान न मानता, लवकरात लवकर शिक्षण अधिकारी होण्याची अपेक्षा प्रकट केली. यावेळी जि.प.मराठी शाळा , जि.प.उर्दू कन्या व मुलांची शाळा, चे सर्व शिक्षक,राजेंद्र पाटील, ग्रॅडेड मुख्याध्यापक अब्दुल एजाज, शाहेदा हारून, शाहेदा युसुफ, शाइस्ता देशमुख, शोएबा सातभाई, नसीम खाटीकशाहीन शेख,शबाना देशमुख, सुमय्या देशमुख, सलमा शेख, सलाउददीन शेख, खिजर सातभाई, जावेद रहिम शेख उपस्थित होते.