पाचोऱ्यात वादळी पाऊसाने विज वितरण चे नुकसान :कॉग्रेस धावली मदतीला
पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा शहरातील व तालुक्यात वादळी पाऊसाने कहर केल्याने विज वितरण व्यवस्था कोलमडली अनेक ठिकाणी नुकसान झाले कॉग्रेस मदतीला आली.
पाचोरा शहरातील व तालुक्यात पडलेल्या वादळी वाऱ्यासह पाऊसा मुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून काल रात्री पासुन विज वितरण व्यवस्था कोलमडली आहे. यामुळे नगर परिषद कर्मचारी सह विज वितरण कर्मचारी आणि अधिकारी यांनी जिकरीने वीज वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले असून या त्यांच्या कार्याला सलाम ठोकत काँग्रेस चे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी देखील मदत कार्यामध्ये सहभाग नोंदवला आहे. महसूल विभागाचे कर्मचारी यांनी बऱ्याच ठिकाणी शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे
केले आहेत. तर ग्रामीण भागात घरांचे देखील पंचनामे केले आहे. पाचोरा शहरातील मध्यवर्ती भाग पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय या साऱ्यांची वीज तब्बल २० तासापासून गुल होती. त्याचे कारण ग्रामीण रुग्णालयाचे भले मोठे निंबाच्या झाडाची एक फांदी वीज वितरणच्या तारांमध्ये अडकल्यामुळे सकाळपासून भली मोठी कसरत विज वितरण कर्मचारी यांना करावी लागत होती. त्यातच या विभागाचे लाईनमन अमोल राजपुत यांनी स्वतः च्या पैशांची पदरमोड खर्च करून त्यांनी तात्काळ क्रेनचा वापर करून त्या ठिकाणी नगर परिषदेचे आपत्कालीन विभागाचे कर्मचारी आबा पाटील, राजेंद्र भोसले यांनी स्वतः कटर मशीन ने सदरचे झाड आपल्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील विज पुरवठा चा अडथळा दूर झाला.. भुमी अभिलेख सह इतर शासकीय कार्यालयात च्या ठिकाणी मोबाईल च्या बॅटरी उजेडात कर्मचारी यांनी आजचे काम काज केले. या वादळी पाऊसामुळे किती नुकसान झाले याचा आकडा मिळु शकला नाही.