पत्रकारावर हल्ला करणाऱ्या मोन्या उर्फ प्रज्ञेश शिंदे या सराईत गावगुंडांच्या गावठी कट्टे आणि जीवंत काडतुसा सह मुसक्या आवळून केले गजाआड, कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या मोन्या उर्फ प्रज्ञेश शिंदे या सराईत गावगुंडांच्या गावठी कट्टे आणि जीवंत काडतुसा सह मुसक्या आवळून केले गजाआड, कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) केडगाव येथील वैष्णव नगर भागातील पुण्यातील दैनिकाचे पत्रकार अरुण नवथर हे शुक्रवार दिनांक ६ जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास आपल्या नाथ क्रुपा अपार्टमेंट मध्ये बसलेले असताना तेथे मोन्या उर्फ प्रज्ञेश शशिकांत शिंदे हा संरक्षण भिंतीवरून उडी मारून कंपाऊंडच्या आत मध्ये आला.त्यावेळी पत्रकार अरुण नवथर यांनी भिंतीवरून उडी मारून का आत आलात असे विचारले असता त्यांनी लगेचच पत्रकार नवथर यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण करीत जिवघेणा हल्ला केला होता.या बाबद पत्रकार नवथर यांनी अहिल्या नगर येथील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ५३२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११८(१),११५(२),३५२प्रमाणे ६ जून रोजी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल लगड, संदिप रोडे,सुनिल चोभे,सुशिल थोरात, दौलत झावरे,अन्सार सय्यद,संदिप जाधव, अल्ताफ कडकाले, बाळासाहेब धस, सुर्यकांत वरकड, सचिन दसपुते, शिवाजी शिर्के, सुहास देशपांडे,नितीन पोटलाशेरू,अशोक झोटींग,श्रीराम जोशी, मिलिंद देखणे,राम नळकांडे,अशोक निंबाळकर,देविदास आंधळे,दिपक मेढे, गोरक्षनाथ शेजुळ, संदिप दाणी,आदिल शेख,सुर्यकांत नेटके,मयुर मेहता, नवनाथ खराडे,ज्ञानदेव शेलार,गोरक्षनाथ बांदल, दिपक कांबळे, गणेश देखमाडे, बाबा ढाकणे,शिवामृत सालगरे,समर्थ गोसावी,सुधाकर जाधव,मकरंद बिडवाई, अक्षय आरकल, विलास राजगुरू, प्रहार अपंग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे,संदिप शेंडकर, जिल्हा बार असोसिएशनचे राजेश कातोरे,वैभव आघाव, संदिप बुरके,सुरेश लगड,मनिषा केळगंद्रे,जया पाटोळे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन आरोपीवर कडक कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन दिले होते.या पत्रकार हल्ल्याची अतिशय गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी नगर शहर,आणि कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना पत्रकार हल्ल्यातील अनोळखी संशयित आरोपीची कसुन चौकशी करून शोध घेऊन कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.१०जुन रोजी पेट्रोलींग करीत असताना पोलीस काॅंन्स्टेबल अतुल कोतकर व शिरीष तरटे यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती की पोलीसांच्या रेकाॅर्ड वरील गुन्हेगार मोन्या उर्फ प्रज्ञेश शशिकांत शिंदे,राहणार वैष्णव नगर, केडगाव, अहिल्यानगर हा रात्रीच्या वेळी गावठी कट्टे आणि देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर घेऊन परीसरात दहशत निर्माण करून लोकांना त्रास देत आहे.आणि काही वेळातच तो वैष्णव नगर केडगाव परीसरात येणार आहे.ही माहिती सदर पोलिसांनी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रतापराव दराडे यांना दिली.त्यांनी लगेचच सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे आणि त्यांच्या सोबत पोलिस पथक पंचासह कारवाई करण्यासाठी रवाना झाले.आणि मोन्या उर्फ प्रज्ञेश शशिकांत शिंदे राहणार, वैष्णव नगर,केडगाव याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळील काळ्या रंगाचे आणि देशी बनावटीचे १२००० रुपये किंमतीचे अग्णीशस्त्र आणि त्याच्या सोबत ४०० रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतुसे हस्तगत केले.या शस्त्राबाबद त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानें ही शस्त्रे सुरज उर्फ सोमनाथ राजू केदार, राहणार, केडगाव यांच्या कडून घेतली असल्याचे सांगितले.त्या वरून या दोघांच्या विरोधात कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ५४३/२०२५ भारतीय शस्त्रे अधिनियम आर्म ॲक्ट १९५९चे कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.६ जून रोजी पत्रकारावर जीवघेणा हल्ला करणारा हल्लेखोर हाच असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.त्याने तसा कबुली जबाब ही पोलीसांना दिला आहे.पत्रकार नवथर यांना हा संशयित आरोपी दाखवला असता त्यांनी हाच हल्लेखोर असल्याचे सांगितले. सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,शहर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रतापराव दराडे, सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे,पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र औटी, संदिप पितळे,दिपक रोहोकले,तानाजी पवार,दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे यांनी केली आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी पत्रकारांना दमदाटी केली जाते. गावठी कट्टे आणि जीवंत काडतुसे यांच्या संदर्भात काही माहिती प्रसिद्ध केली की स्थानिक पत्रकारांना धमकावले जाते.जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील गावठी कट्टे आणि जीवंत काडतुसे अवैधरित्या जवळ बाळगणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.अनेक ठिकाणी अवैध धंदे करणारे ही पत्रकारांना आपले लक्ष्य बनवीत आहेत.जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नवनविन प्रयोग राबवावेत आणि गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या गुन्हेगारांचे मनके ढीले करावेत अशी जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेची मागणी आहे.अनेक गावातील शाळेचे कट्टे, मंदिरातील ओटे हे नशेखोरांचे अड्डे बनले आहेत.त्या त्या परीसरातील बीट हवालदारांना या कट्यावर लक्ष केंद्रित करून या समाज कंटकांना वेसण घालण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हा पत्रकार संघ, जिल्हा बार असोसिएशन आणि प्रहार अपंग संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे यांना जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले असता पत्रकार हल्ल्यातील अनोळखी गुन्हेगारांच्या त्वरित मुसक्या आवळल्या जातील हे आश्वासन दिले होते ते त्यांनी पुर्ण करुन दाखविले आहे.या कारवाई मुळे पत्रकाराकडे वाकडी नजर करून पाहण्याची कोणी हिंमत करणार नाही.