अहमद रजा फाउंडेशन पाचोरा तर्फे डॉक्टर मोहसीन यांच्या सत्कार

अहमद रजा फाउंडेशन पाचोरा तर्फे डॉक्टर मोहसीन यांच्या सत्कार

जिल्हा परिषद उर्दू मुलांची शाळा पाचोरा येथे शिक्षण घेऊन अत्यंत वाईट परिस्थितीत लढून डॉक्टर बनणारे डॉक्टर मोहसीन मसूद बागवान यांच्या पाचोरा येथे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी बहुउद्देशीय संस्था अहमद रजा फाउंडेशन मार्फत सत्कार करण्यात आला. मोहसिनचा जनम एका गरीब कुटुंब मध्ये झाला. त्याचे वडील आताही एका गॅरेज शॉप मध्ये मेहनत मजुरी करतात. आपल्या बचपन पासून ही मोहसीनने गरिबी व सोयी सुविधाची कमतरता पाहिलेली होती. कार्यक्रम मध्ये डॉक्टर मोहसीन यांनी आपल्या शैक्षणिक प्रवास, यामध्ये येणारे चॅलेंजेस व अहमद रजा फाउंडेशन पाचोरा ने केलेली आर्थिक सहाययता यावरही प्रकाश टाकला. कार्यक्रमचे मुख्य अतिथी म्हणून पीर मुसा कादरीया एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी चे सेक्रेटरी हाजी शकील मंसूरी व शकील सुबहानी हे उपस्थित होते. शकील सुबहानि, केंद्रप्रमुख नासिर खान, शेख जावेद रहीम यांनी कार्यक्रम मध्ये उपस्थित विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमचे उद्दिष्ट नासिर खान यांनी मांडले. सूत्रसंचालन शेख जावेद रहीम यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी मस्जिद – नजीर अहले सुन्नत पाचोरा चे ट्रस्टने यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम मध्ये मौलाना तोसिफ रजा, जाकीर खाटीक, अल्ताफ खाटीक, इब्राहिम खाटीक, जुबेर मन्सुरी, अनिस मणियार, अन्वर टकारी, मजाहीद खान, आरिफ मणियार , जाहिद मणियार, आदी मान्यवर उपस्थित होते.