पुढील तिन वर्षे शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज राहील आणि पुढील पाच वर्षे वीजबिल भरावे लागणार नाही: ना.बावणकुळे
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुढील तिन वर्षे दिवसा बारा तास वीज राहील आणि पुढील पाच वर्षांत वीज बिल भरावे लागणार नाही अशी घोषणा महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.ते अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातील खंडोबा माळावरील मैदानात झालेल्या देवाभाउ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्या प्रसंगी बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे आणि पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे होते. नामदार चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की प्रत्येक गावात एक चॅम्पियन आणि एक पैलवान तयार झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी शेतरस्ताही तयार झाला पाहिजे.शिवरस्ते आणि पाणंद रस्ते,शेत वहीवाटीचे रस्ते तयार करणं हे सरकारचे धोरण ठरले आहे.तसेच महीला साठीची लाडकी बहिण ही योजना पूर्ण पाच वर्षे सुरू राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे जिल्हा तालीम संघाचेही कौतुक केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. विधानपरिषदेचे सभापती नामदार रामजी शिंदे यांनी त्यांच्या मतदार संघातील कर्जत तालुक्यातील महिला कुस्ती पटू सोनाली मंडलिक हीने तीन नंबरची एक लाख रुपयांची कुस्ती जिंकल्यानंतर तीचे अभिनंदन केले.तीने हरीयानाची नॅशनल मेडलिस्ट उषा कुमारी हीचा पराभव केला.दुसरी दीड लाख रुपयांची कुस्ती महाराष्ट्र केसरी हर्षद सदगिर यांनी जिंकली त्यांनी दुसरा महाराष्ट्र केसरी प्रृथ्वीराज पाटील यांचा पराभव केला. याप्रसंगी आयोजक महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरूण भाउ मुंडे यांनी तिन्ही मान्यवर नामदारांचा सन्मान केला.लोळेगावचे बिरोबा भक्त बाबाजी बनसुडे यांनी नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा धनगरी काठी आणि घोंगडे देउन सन्मान केला.या प्रसंगी नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे,गोकुळ दौंड,अर्जुनराव शिरसाठ,प्रतापराव ढाकणे,अंकुशराव ढाकणे, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान वैभव लांडगे, खजिनदार पैलवान नाना डोंगरे,अजय बारस्कर, डॉ धिरज लांडे,नंदुभाउ मुंडे, रामदेहडराय,कडूभाउ मगर,अंकुश साळवी यांच्या सह अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ, शेवगाव तालुका तालीम संघ, आणि वंदेमातरम क्रीडा व सांस्कृतिक मंडळ शेवगाव यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी नामदारांच्या हस्ते जीम आणि क्रीडा संकुलाचेही भव्य दिव्य असे उद्घाटन करण्यात आले.या कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी जिल्ह्यातील अनेक कुस्ती पटूंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.खंडोबा मैदानात यात्रेचे स्वरूप आले होते.