लोहटार येथे तब्बल एका महिन्यात शेतात दोन वेळा चोरी

लोहटार येथे तब्बल एका महिन्यात शेतात दोन वेळा चोरी

पाचोरा-तालुक्यातील लोहटार येथील शेतकरी गजमल वामन पाटील यांच्या मालकीची शेत गट क्रमांक 131/2/ब/1/ब या जमिनीत घटनेच्या पंधरा दिवसापूर्वी ट्यूबवेल केला असता ट्रायल म्हणून नाना रामभाऊ पाटील यांच्या शेतातील इलेक्ट्रीक पोलवरून दि.03 जुन 2023 रोजी सर्व्हिस वायर टाकली. याच दिवशी पाण्याचे टेस्टींग करून दुपारी चार च्या सुमारास सदरचे शेतकरी मोटर बंद करून घरी गेले असता काही कामानिमित्त ते तालुकाच्या ठिकाणी पाचोरा येथे गेले व तेथून परत रात्री नऊच्या सुमारास शेतात गेले असता तेव्हा देखिल सदरची वायर व मोटर सुस्थितीत होती. परंतू दि.04 जुन 2023 रोजी सकाळी 7 च्या सुमारास शेतकरी गजमल पाटील गेले असता 7.48 गेजची 150 मीटर लांबीची वायर चोरी झाल्याची लक्षात येताच शेतकरी यांनी पाचोरा पोलिस स्टेशनला दि.06 जुन रोजी प्रत्यक्ष हजर होवून संबंधीत संशयीत विरोधात 6,750 रूपयांची सर्व्हिस वायर चोरी गेल्याची फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनला भा.द.सं.1860 कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच लोहटार येथूनच बापू लालचंद परदेशी वय 50 वर्ष धंदा शेती रा. लोहटार ता. पाचोरा हे पत्नी सौ. मालताबाई दोन मुली तसेच वडील लालचंद रामभाऊ परदेशी यांचेसह लोहटार येथे राहतात, त्यांची लोहटार शेत शिवारात गट नं. 711 मध्ये 07 एकर शेतजमीन असुन हे शेत भडगांव ते पाचोरा रोडवरील तितुर नदिजवळ आहे. त्यांच्या शेतातील गोठ्यात शेतीऊपयोगी साहीत्यासह 1 म्हैस व पारडू बांधलेले राहत होते. दिनांक 23/07/2023 रोजी सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास ते शेतीची कामे करून म्हशीचे दूध काढुन घरी आले तेव्हा म्हैस व तिचे पारडू हे शेतात बांधलेली होते, त्यानंतर दुस-या दिवशी दिनांक 24/07/2023 रोजी सकाळी 06/00 वाजेचे सुमारास शेतात पुन्हा म्हशीचे दूध तसेच चारापाणी करण्यासाठी गेले असता म्हैस व पारडू हे त्याठिकाणी बांधलेले दिसुन आले नाही त्यांनी म्हशींची शेतात तसेच इतरत्र आजपावेतो घेतला असता ती मिळुन आली नाही त्यामुळे 30,000/- रुपये किंमतीची एक काळ्या रंगाची गोल शिंगांची म्हैस व पारडु हे कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे संमतीशिवाय लबाडीचे ईराद्याने चोरून नेली आहे. म्हणून त्यांनी अज्ञात चोरट्याविरुध्द पाचोरा पोलिसात फिर्याद दिली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश पाटील हे करीत आहेत.