सन 2022 च्या परधाडे वि.का. सोसा. निवडणूकीत घोळ-

सन 2022 च्या परधाडे वि.का. सोसा. निवडणूकीत घोळ-

पाचोरा-तालुक्यातील परधाडे वि.का.सोसा. निवडणुकीचा कार्यक्रम दि 28 फेब्रू 2022 रोजी जाहीर करण्यात आला. त्यानुसार निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले होते. दि. 9 मार्च रोजी छाननी अंती उमेदवारी अर्ज कायम करण्यात आले. त्यानंतर दिनांक 24 मार्च पर्यंत दोन उमेदवारांनी माघार घेऊन सरळ लढत होणार असल्याचे निश्चिती नंतर निवडणुक कार्यक्रमा नुसार दि. 25 मार्च 2022 रोजी चिन्ह वाटप देखील करण्यात आले तरी अधिकृत रित्या प्रथम दर्शनी कार्यालया बाहेर त्याबाबतीचे पत्र देखील लावण्यात आले होते. मात्र निवडणुक प्रक्रीयेतील संबधीत अधिकारी यांनी आर्थीक व्यवहारा अंती दि. 28 मार्च रोजी दुपारी 3 वाजेदरम्यान अनधिकृतरित्या गैरमार्गाने माघार प्रक्रिया संपन्न कसून तातडीने अविरोध उमेदवारांची यादी प्रसिध्द देखील केली हि नियमबाह्य निवडणूक प्रक्रिया अधिकृत 24 मार्च 2022 रोजीची प्रक्रिया संपन्न झाल्याचे दाखवण्यात आले परंतु वेळोवेळी कार्यालयाच्या प्रथम दर्शनी लावण्यात आलेले भित्तीपत्रक काढायचे राहुन गेल्याने त्याचे अधिकृत फोटो लोकेशनसह दिनांक वेळ असलेले फोटो काढले आणि त्याबाबत वरीष्ठ स्तरावर व न्यायालयीन स्तरावर तक्रार करणेसाठी सोसा. सभासद रामदास महाजन यांनी संपुर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेची माहिती व छायांकित प्रती मिळवण्यासाठी रीतसर मी आज दि. 1 एप्रील 2022 रोजी अर्ज निवडणुक अधिकारी व संबधित विभागास दिला असता त्यांनी तो स्विकारुन पोचह देण्यास नकार दिला. त्यामुळे प्रथम दर्शनी फोटों लोकेशन दिनांक, वेळ लक्षात घेता व सभासद रामदास महाजन यांच्याकडे उपलब्ध असलेल्या छायांकित प्रतिनुसार असे दिसून येते की परधाडे वि.का.सोसा.2022 निवडणुकीत सरळ लढत होणार होती तशा प्रकारचे चिन्ह वाटप पत्र हे सोसायटी कार्यालयाबाहेर लावण्यात आले होते. पण अचानक झालेल्या आर्थिक व्यवहारानंतर दि. 28 मार्च रोजी नियमबाह्य पद्धतीने सादर निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. या निवडणुकी संदर्भात संपन्न झालेली प्रक्रीया नियमबाह्य व चुकीची तसेच सहकार निवडणुक आचार संहितेचे उल्लंघन करून झालेली असल्याची तक्रार योग्य त्या पुराव्यासह रामदास महाजन यांनी पोलीस प्रशासनाकडे संबधितांकडे रजि. पोस्ट, ई- मेल व्दारे वरीष्ठ पातळीवर केलीआहे. या सर्व नियमबाहय प्रकियेस सहकार्य करणार्‍या अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात मे उच्च न्यायालय व योग्य त्या स्तरावर विधीतज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली तक्रार दाखल करणार आहे.