नवीन आदर्श माध्यमिक विद्यालयात “स्पंदन” अंतर्गत विद्यार्थ्यांचे समुपदेशन

नवीन आदर्श माध्यमिक विद्यालयात “स्पंदन” अंतर्गत विद्यार्थ्यांचे समुपदेशन

पाचोरा — येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित नवीन आदर्श माध्यमिक विद्यालयात “स्पंदन- शृंखला समुपदेशनाची” या कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सुमारे 250 विद्यार्थी -विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घेताला.

युवा नेते अमोल भाऊ शिंदे यांच्या संकल्पनेतून शिंदे अकॅडमी पाचोरा यांचे तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाचोरा तालुका भाजपा उपाध्यक्ष ग्रामीण तथा तज्ञ मार्गदर्शक सौ. ललिता पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. या समुपदेशनात प्रामुख्याने सामाजिक जाणीव जागृती, अभ्यासाचे नियोजन व समाज माध्यमांचा स्वयंविकासासाठी वापर, यासह जीवनमूल्य आणि समायोजन क्षमता इत्यादी विषयावर सौ ललिता पाटील यांनी मार्गदर्शन केले.

आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. पूजाताई शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री. एम. बी. देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले. श्रीमती के. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन तर श्रीमती .ए.एम. सायानी.यांनी आभार प्रकटन केले. या कार्यक्रमाला विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.