धरणगाव महाविद्यालयात एन. एस. एस. तर्फे रेड रिबन क्लबची स्थापना

धरणगाव महाविद्यालयात एन. एस. एस. तर्फे रेड रिबन क्लबची स्थापना.
राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथे शैक्षणिक वर्ष 2023 24 साठी रेड रिबन क्लब (आरआरसी) स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. पंकज देशमुख, आय. क्यू. ए.सी. कॉर्डिनेटर प्रा. संदीप पालखे, प्रमुख मार्गदर्शक आय. सी. टी. सी. कौन्सिलर श्री ज्ञानेश्वर शिंपी ग्रामीण रुग्णालय धरणगाव हे व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री ज्ञानेश्वर शिंपी रेड रिबीन क्लब द्वारे एड्स बाबतीत तसेच आरोग्यविषयक  समुपदेशन समाजात आरसीसीच्या स्वयंसेवकांनी करावे असे मत व्यक्त केले. तसेच  समाजामध्ये एच आय व्ही एड्स बाबत असलेले गैरसमज आणि  त्याचे निराकरणाबद्दल महत्त्व विशद केले. अध्यक्षिय समारोपात प्रा. पंकज देशमुख यांनी रेड ट्रिबल क्लबचे उद्घाटन झाले असे जाहीर केले व रेड रिबीन क्लब द्वारे वर्षभरात राबवले जाणारे विविध उपक्रम याची उपस्थित स्वयंसेवकांना माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. अभिजीत जोशी यांनी केले तर आभार डॉ. ज्योती महाजन यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी गौरव महाजन, डॉ. डी. आर.बोंडे.,प्रा. आर. एम. केंद्रे, डॉ.व्ही. ए. वारडे , श्री. सुजित जैन, भरत खैरनार, रोहित पटूने विदयार्थी स्वयंसेवक, स्वयंसेविका यांचे सहकार्य लाभले.