पाचोरा येथे महावीर व्यायाम शाळा तर्फे तालुका कुस्ती स्पर्धा संपन्न

पाचोरा येथे महावीर व्यायाम शाळा तर्फे तालुका कुस्ती स्पर्धा संपन्न

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद सलग्न असलेला पाचोरा तालुका कुस्ती संघ आणि या संघाच्या चाचणी स्पर्धा दिनांक 14 10 2023 रोजी महावीर व्यायाम शाळा व क्रीडा संस्था श्रीराम मंदिर पाचोरा येथे नगरसेवक मा सतीश चडे यांचे अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे गजानन जोशी व तालुका कुस्ती संघाचे अध्यक्ष मालोजीराव भोसले तसेच श्रीराम मंदिर येथील पुजारी सूरदास महाराज गोकुळ पाटील सर राजेंद्र पाटील महावीर व्यायाम शाळा अध्यक्ष तात्या नागणे गंपा पैलवान वस्ताद दिनेश पाटील मार्गदर्शक रईस पैलवान भावलाल पैलवान देविदास पैलवान प्रवीण पाटील आदी मान्यवर यांचे यांचे हस्ते श्री छत्रपती शिवराय यांचे व हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन मला अर्पण करून करण्यात आले यावेळी पंच म्हणून कैलास आमले सर व सुनील पाटील सर यांनी काम पाहिले पाचोरा तालुक्यातील 50 ते 60 मल्लांनी सहभाग नोंदवला आलेल्या मान्यवरांचे तालुका कुस्तीगीर सचिव कैलास आमले सर यांनी आभार मानले व स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या