पाचोऱ्यात जय हिंद लेझीम मंडळ तर्फे गतिरोधक संदर्भात स्मरण पत्र
जळगाव-चांदवड महामार्गावरील भारत डेअरी बस स्टॉप ते पांडव नगरीपर्यंत गतिरोधक बसविण्याबाबत अंमलबजावणी न केल्याने उपविभागीय अधिकारी सो. पाचोरा भाग पाचोरा यांना जयहिंद क्रीडा व लेझीम मंडळ कृष्णापुरी यांच्या वतीने
दिनांक २५/०८/२०२३ रोजीच्या गतिरोधक बसविणे व इतर मागण्यांसाठी झालेले लाक्षणिक उपोषण व कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, धुळे यांचे (जा.क्र.रेशा/गतिरोधक / १०१७/२०२३) या संदर्भिय पत्रानुसार निवेदन देण्यात आले.
त्यात मंडळाच्या निवेदनात दिनांक २५/०८/२०२३ शुक्रवार रोजी वरील मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण केले होते. त्यात वरील संदर्भीत पत्रानुसार तसेच आपल्या तोंडी आश्वासनानुसार आपण लवकरात लवकर कारवाई करणार होतात. परंतु आज पावेतो कोणतीही कार्यवाही व अंमलबजावणी यावर झाली नाही. त्यामुळे आपण या विषयाकडे लक्ष घालून तातडीने अंमलबजावणी करावी जेणेकरून भविष्यातील होणाऱ्या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा अपंगत्व येऊ नये, म्हणून आपणास या स्मरणपत्राद्वारे विनंती करीत आहोत की, येत्या दहा दिवसात आपण यावर योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा आम्ही साखळी उपोषण तसेच त्यानंतर ठिय्या आंदोलन पुकारून आमचा लढा तीव्र करू असा इशारा प्रशासनास दिला आहे.