चोपडा महाविद्यालयात ‘स्वच्छ्ता अभियान’ तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती’ साजरी

चोपडा महाविद्यालयात ‘स्वच्छ्ता अभियान’ तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती’ साजरी

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व महात्मा गांधी संशोधन व अभ्यास केंद्र यांच्या वतीने दि. ०२ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ व ‘भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती’ निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन. एस. कोल्हे हे उपस्थित होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय सेवा योजना चोपडा विभागाचे विभागीय समन्वयक डॉ. दिलीप भीमराव गिऱ्हे,
उपप्राचार्य प्रा.डॉ. श्री के. एन. सोनवणे, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. शैलेश वाघ
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. के. लभाने, सहा.कार्यक्रमाधिकारी व्ही. पी.हौसे, सौ. माया शिंदे, एन.सी.सी
प्रमुख डॉ.बी. एम सपकाळ तसेच डॉ. व्ही. आर. कांबळे, डॉ.आर. आर. पाटील, डॉ.सौ.के. एस. क्षीरसागर, बी एच देवरे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रींच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा गांधी व अभ्यास केंद्राचे प्रमुख सौ.एस. बी. पाटील यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी तनुश्री सनेर, गंगा करणकाळे, विशाखा महाले, विशाल कुंभार या विद्यार्थ्यांनी ‘महात्मा गांधीजींचे विचार व लालबहादूर शास्त्री यांचे कार्य’ या विषयावर त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी महात्मा गांधी जयंतीनिमित्त उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापकांनी स्वच्छतेची शपथ घेऊन महाविद्यालयात दि.०१ ऑक्टोबर व ०२ ऑक्टोबर या दोन दिवशी एक तास श्रमदान करून परिसर स्वच्छ करण्यात आपले योगदान दिले.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. दिलीप गीऱ्हे यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनातील विविध प्रसंग व त्यांचे अहिंसा तत्व आजही जगात किती महत्त्वाचे आहे या विषयावर प्रकाश टाकला तसेच भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधीजींच्या योगदानावर चर्चा केली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य एन. एस. कोल्हे यांनी ‘विद्यार्थ्यांच्या भावी जीवनासाठी गांधीविचार व महामानवांचे विचार आत्मसात करणे महत्त्वाचे असून महापुरुषांना समजून घेण्यासाठी त्यांनी ग्रंथालयातील अधिकाधिक पुस्तकांचे वाचन करावे’ असे विद्यार्थ्यांना आवाहन केले तसेच भारत सरकारच्या विविध योजनांमध्ये स्वयंसेवकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कीर्ती पाटील यांनी मानले . या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते.