जळगाव परिमंडळ द्वार सभा संपन्न ६ मार्च २०२५ रोजी एक दिवस लाक्षणिक संप
महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या निर्देशानुसार तिन्ही कंपन्या चे प्रशासनाकडून वीज कंपनीच्या कर्मचारी यांना पेन्शन योजना लागू करावी,३२९ उपकेंद्र खाजगी भांडवलदार कडे कंत्राटी चालवण्यात देऊ नये, वीज कंपनीचे खाजगीकरण धोरणास विरोध, तांत्रिक कर्मचारी यांच्या कामाचे तास व स्वरूप निश्चित करण्यात यावे, तिन्ही कंपन्या चे बदली धोरण संघटनेसोबत चर्चा करून निश्चित करण्यात यावे,मयत कामगार वारसांना नोकरी मिळणे बाबत त्वरित निर्णय घेण्यात यावा या आणि अशा २४ मागण्या मान्य करून न्याय मिळवून देण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू केले आहे त्या पहिल्या टप्प्यात २१ फेब्रुवारी रोजी विभागीय व सर्कल कार्यालय समोर द्वार सभा घेऊन निदर्शने करण्यात आली होती.दुसरा टप्पा मध्ये आज आज दि.२७ फेब्रुवारी रोजी झोन आफिस समोर राज्यभर द्वार सभा घेऊन निदर्शने करण्यात आली त्याचा एक भाग म्हणून जळगाव परिमंडळ कार्यालय समोर द्वार सभा घेऊन निदर्शने करण्यात आली.वरील मुद्दे घेऊन शासन व प्रशासन चे विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला.सभेत मार्गदर्शन करताना संघटनेचे चेअरमन आडिट कमिशन कॉ जे एन बाविस्कर यांनी सांगितले की तळागाळातील कर्मचारी हिताचे निर्णय फक्त वर्कर्स फेडरेशन संघटनेतर्फे आंदोलन करून पदरात पाडले जातात हा इतिहास आहे आणि आपण न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा लागेल ही खूणगाठ बांधून सहभाग घेतला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. केंद्रीय सल्लागार कॉ.पी.वाय पाटील यांनी यवतमाळ येथे संघटनेचे केंद्रीय कार्यकारिणी जाहीर केले त्या प्रमाणे हे रितसर आंदोलन सुरू आहे शासन प्रशासन जो पर्यंत मागणी मान्य करत नाही तोपर्यंत लढा सातत्याने सुरू ठेवला जाईल असे सांगितले.कॉ.विरेंद्रसिंग पाटील राज्य संयुक्त सचिव यांनी मनोगत व्यक्त करताना केंद्र व राज्य सरकार कामगार कर्मचारी यांच्या हिताच्या विरोधात अनेक निर्णय घेत असून त्याला लोकशाही मार्गाने आंदोलन करून निषेध नोंदवून लढाई रस्त्यावर उतरून करण्याशिवाय पर्याय नाही.शासन प्रशासनाने सदर आंदोलन ची दखल न घेतल्यास येत्या ६ मार्च रोजी एक दिवस लाक्षणिक संप करण्याचा इशारा दिला आहे तिसरा टप्पा मध्ये संप अटळ आहे असे प्रतिपादन केले.
सदर सभा कॉ जितेंद्र अस्वार सर्कल सेक्रेटरी जळगाव यांनी प्रास्ताविक केले.सदर सभा यशस्वी करण्यासाठी स्वप्निल बाविस्कर,कॉ.सुरेश धनगर,कॉ रविंद्र पाटील,कॉ रविंद्र गायकवाड,कॉ भरत बाविस्कर,कॉ प्रविण पाटील,कॉ प्रभाकर महाजन,कॉ किशोर जगताप, कॉ सचिन फड,कॉ गिरीश बर्हाटे,कॉ नितेंद्र गिरासे,कॉ विकास तायडे,कॉ हेमंत बारी,कॉ धनंजय पाटील,कॉ आशिष जोशी,कॉ विशाल पाटील,कॉ के डी पाटील,कॉ शरद मोरे,कॉ नरेंद्र पाटील,कॉ हंसराज वंजारी,कॉ जितेंद्र न्हायदे,कॉ.ईश्वर कोळी ,कॉ गोकुळ सपकाळे,कॉ देवेंद्र भालेराव,कॉ गजानन साबळे,कॉ चंदन फेगडे,कॉ सलमान खान,कॉ अजय जमाले,कॉ. ज्ञानदेव कोळी,कॉ.प्रशांत महाजन,कॉ.संजय चव्हाण,कॉ आकाश लोणारी,कॉ महेंद्र ब्राह्मणे, कॉ अनिल ईशी,कॉ भुषण सपकाळे यांनी सहभाग घेतला.