अल्फुरकान इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये प्रोफेट फोर ऑल कार्यक्रम साजरा

अल्फुरकान इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये प्रोफेट फोर ऑल कार्यक्रम साजरा

पाचोरा शहरात प्रसिद्ध अल्फुरकान इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये प्रोफेट फॉर ऑल ( पैगंबर सब के लिये) कार्यक्रम साजरा करण्यात आला. ह्या प्रोग्राम मध्ये विद्यार्थ्यांनी विविध विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनीवर प्रकाशही टाकला. कार्यक्रम मध्ये मौलाना मुख्तार नदवी, गरीब नवाज फाउंडेशनचे सचिव शेख जावेद रहीम ,साजिद खान कुरेशी, मौलवी जब्बार , जैद उमरी, रऊफ शाह आदी मान्यवर व मोठी संख्या मध्ये पालक ही उपस्थित होते. मान्यवरांनी पैगंबर मोहम्मद च्या हवाला देऊन सिद्ध करण्याच्या प्रयत्न केला की पैगंबर साहेबांनी त्यांचे राहत्या जीवनात शिक्षणावर मोठा भर दिला होता. जर आपल्याला जगात टिकायचे असेल तर आपल्या समाजाला शिक्षण प्राप्त करणे हे गरजेचे आहे. सूत्रसंचालन जयद उमरी यांनी केले. कार्यक्रमाला यशस्व बनवण्यासाठी शिक्षक वर्गणे परिश्रम घेतले. या वेळी शिक्षिका शबाना पटेल, शिमा सादिक खान, फरहाना सय्यद, मनियार इशरत आदी उपस्थित होते.