युवा व्याख्याते श्री.गणेश शिंदे यांचे जाहीर व्याख्यान

युवा व्याख्याते माननीय श्री.गणेश शिंदे यांचे जाहीर व्याख्यान

 

आम्ही सारे जण भारतीय आहोत. भारतीय संस्कृती व अस्मिता अद्वितीय आहे.या पवित्र भूमीत अवतार पुरुष झालेत, संत महात्मे, थोर महापुरुषांचा आदर्श आहे.पवित्र धर्मग्रंथातून उच्चसंस्कार, न्याय, निती, धर्म, निती मूल्यांचा, मार्गदर्शनाचा अनमोल ठेवा आहे.पवित्र नातेसंबंध,एकोपा, प्रेम, जिव्हाळा, सामाजिक बांधिलकी,मानवता, सदाचार, आमच्या पूर्वजांनी जोपासण्याचा आदर्श इतिहास आहे.असा आमचा थोर वसा आहे.आजच्या समाजातील भयावह स्थिती पाहता याचा आम्हास विसर पडलेला आहे.आज सर्वत्र अनाचार, अत्याचार, हिंसाचार, बलात्कार त्यातून हत्या, आत्महत्या, व्यसनाधीनता, विसंवाद आदी राक्षसी प्रवृत्तीने उग्ररूप धारण केलेले आहे. रोजच्या मनाला सुन्न करणाऱ्या घटना घडत आहेत. कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली.समाजात निराशा, उदासिनता, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागली.समाज अस्थिर झाला. शिक्षण सोबत असताना देखील भावी युवा पिढी विनाशाकडे वाटचाल करीत आहे.
युवाशक्ती ही भारतीय संपत्ती आहे.तिचे रक्षण व संरक्षण व्हावे त्यांच्यावर उत्तम संस्कार व्हावेत.मन, वाणी, विचार शुद्ध व्हावेत.त्याच्यातून आज्ञाधारक पुत्र, उत्तम नागरिक निर्माण व्हावा.आजी आजोबा आई- वडील भाऊ-बहीण या पवित्र नात्यांची जोपासना करून शेजारधर्म पाळावा.समाजात मानवता सदाचार चांगुलपणा वाढीस लागावा.भरकटलेले जीवन सावरावे. या मंगल हेतूने माननीय सौ. वैशालीताई सुर्यवंशी शिवसेना नेत्या, पाचोरा-भडगाव यांच्या वतीने
युवा व्याख्याते माननीय श्री.गणेश शिंदे यांचे जाहीर व्याख्यान दि. 26/8/ 2023 शनिवार रोजी दुपारी 3:00 वाजता महालपुरे मंगल कार्यालय, पाचोरा येथे आयोजित करण्यात आलेले आहे.या सत्कार्यासाठी आपल्या परिवारासह उपस्थित राहून विचारधन, संस्कारांची शिदोरी घरोघरी पोहचू या सत्कायासाठी हातभार लावूया.
जय हिंद जय महाराष्ट्र