माध्यमिक विद्यालय,पळासखेड्याचा,पहिलवान स्वराज चौधरी यांस राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक

_माध्यमिक विद्यालय,पळासखेड्याचा,पहिलवान स्वराज चौधरी यांस राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक…!!!!_

भडगाव (प्रतिनिधी) –
कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,माध्यमिक विद्यालय,पळासखेडे ता-भडगाव येथील इयत्ता दहावीचा विद्यार्थी व किसान स्पोर्ट्स अकॕडमीचा पहिलवान स्वराज प्रल्हाद चौधरी याने ढवळ ता.फलटण जि.सातारा येथे आयोजीत खासदार श्रीमंत रणजितसिंह नाईक निंबाळकर “ढवळ केसरी” राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत द्वितीयस्थान प्राप्त करीत रौप्यपदक प्राप्त केले आहे.
स्वराज यांस सह्याद्री तालीम संकुल,पुणे येथील पहिलवान बापू मदने,सयाजी मदने,प्रल्हाद चौधरी,प्रमोद थोरात,विजय बराटे,संदीप पठारे,निलेश पाटील,दिलीप पडवळ,संजय दाभाडे,म्हस्के आप्पा,पाटील सर,आकाश सोनवणे,साहिल संकपाळ,बी.डी.साळुंखे,क्रीडा शिक्षक अमोल पाटील,प्रा.सतीश पाटील,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
स्वराजच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,सचिव डॉ.पुनमताई पाटील,मंत्रालयीन उपसचिव प्रशांतराव पाटील,विद्यालयाचे मुख्याध्यापक अभिजीत शिसोदे यांनी तसेच विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनी यांनी आनंद व्यक्त करीत त्याचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.