आयुष्यमान भव: कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे आनंदोत्सवात साजरा

आयुष्यमान भव: कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे आनंदोत्सवात साजरा

आज दिनांक २ सप्टेबर २०२३ ला आयुष्यमान भव :या कार्यक्रमाचे उद्घाटन ऊपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उत्साहात करण्यात आले. आयूष्यमान भव : हा केंद्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी आरोग्यविषयक मोहीम आहे आणि ति तळागाळातील लोकांपर्यंत, प्रत्येक व्यक्ती पर्यंत मोफत आरोग्य सेवा पोहचावी हा उद्देश साध्य करण्यासाठी आयुष्यमान भव: ही मोहीम हाती घेण्यात आली. ही मोहीम १ सप्टेंबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत राबविली जाणार आहे.
हा कार्यक्रम मा.डॉ हेमचंद कन्नाके निवासी वैद्यकीय अधिकारी चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा.श्रीमती शिवनंदा लंगडापुरे उपविभागीय अधिकारी वरोरा म्हणून लाभल्या.प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री सुभाष भाऊ दांदडे आमदार प्रतीनिधी वरोरा, तसेच मा.डाॅ रामटेके साहेब डिस्ट्रिक्ट ट्रेनर आॅफिसर, मा.डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक डॉ बोरकर तालुका अधिकारी, डॉ भगत वैद्यकीय अधीकारी,सौ वंदना विनोद बरडे सह.अधीसेविका इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी दिपप्रज्वलन करून सरस्वती मातेच्या फोटोंचे पुजन व माल्यार्पन करून कार्यक्रमाची सुरुवात पोषण आहार गीताने करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकात आयुष्यमान भव : कार्यक्रमांची रुपरेषा समजावून सांगितली.आणी कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या.
मा.श्रीमती शिवनंदा लंगडापुरे माॅडम यांनी हा कार्यक्रम जनमानसात पर्यंत पोहोचला पाहिजे असे प्रयत्न करायला पाहिजे असे सांगितले कार्यक्रमांची माहिती दिली आणि भरभरून शुभेच्छा दिल्या.
मा.सुभाषभाऊ दांदळे यांनी शूभेच्छा दिल्या तसेच रूग्णालयातील परिसेविका व अधिपरिचारीका व कर्मचारी यांच्या कामांचे कौतुक केले.आणी कार्यक्रमांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कळविले.
मा डॉ किन्नाके साहेब यांनी आयुष्यमान भव कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली पोषण आहार सप्ताह व महिना यांची माहिती दिली तसेच खानपान विषयी माहिती दिली.आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड विषयी माहिती दिली आणि जनजागृतीपर अध्यक्षीय मार्गदर्शन केले.
सौ सोनाली राईसपायले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
सौ वंदना विनोद बरडे सह. अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांनी कार्यक्रमाच्या आयूष्यमान भव : कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार मानले आणि आपल्या आभारप्रदर्शनात या वर्षाच्या पोषण आहार सप्ताह व महिना यांच्या थीम विषयी माहिती दिली.भरडधान्य , त्रुनधान्य हे कमी खर्चाचे आणि जास्त उत्पादन देणारे व सर्व पोषकतत्वयुक्त आहे हे समजून सांगितले.तसेच शेती ही रासायनिक खतांच्या वापर न शेंद्रीय खतांचा वापर करण्याचे आवाहन केले.जर जमीन सुपीक असेल तर उत्पादन पोषणयुक्त होईल म्हणून शेती शेंद्रीय पध्दतीने करावीं.तसेच फास्ट,फुड डब्बा बंद अन्न टाळावे.हे समजावून सांगितले आणि सर्वांचेच मनःपूर्वक आभार मानले व कार्यक्रमांची सांगता त्यांनी कवितेच्या दोन ओळीने केली.
“”झाले गेले विसरून जावे
पुढे पुढे चालावे “”
“”जीवन गाणे गातच राहावे
गातच राहावे “”,या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व परिसेविका व अधिपरिचारीका व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.या कार्यक्रमाला सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तसेच लाभार्थीही रुग्ण व नातेवाईक होते.सर्वांनी शैल्फि पाईन्टला सर्व मान्यवरांनी फोटो काढले.आणी मान्यवरांनी आहार प्रदर्शन, पोस्टर,बाॅनर यांच्या प्रदर्शनाला भेट दिली आणि भरभरून शुभेच्छा दिल्या.