समर्थ गोविंद महाराज पतसंस्थेच्या व्हा चेअरमनपदी अशोक पाटील यांची निवड

समर्थ गोविंद महाराज पतसंस्थेच्या व्हा चेअरमनपदी अशोक पाटील यांची निवड

पाचोरा – येथील समर्थ गोविंद महाराज बिगरशेती सह. पतसंस्थेच्या दि. 23 मे रोजी झालेल्या मासिक मीटिंगमध्ये संस्थेच्या व्हाईस चेअरमन पदासाठी परधाडे येथील अशोक माधव पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीनंतर त्यांचा सत्कार पतसंस्थेतर्फे ह भ प नरहरी रामदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन सिताराम पाटील, ज्येष्ठ संचालक डी. एल. आप्पा पाटील, दामू पाटील, डॉ जयंतराव पाटील, प्रकाश पाटील, मॅनेजर विजय सोनजे, भगवान पाटील परधाडे वि.का. सोसायटीचे चेअरमन भागवत पाटील, यांचे सह सर्व संचालक कर्मचारी उपस्थित होते. या निवडीबद्दल अशोक पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.